Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक

Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक

Multibagger bank stock : बँकेच्या सप्टेंबर २०२१ तिमाहीदरम्यान नेट प्रॉफिटमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 04:38 PM2021-10-27T16:38:33+5:302021-10-27T16:39:29+5:30

Multibagger bank stock : बँकेच्या सप्टेंबर २०२१ तिमाहीदरम्यान नेट प्रॉफिटमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे.

Billionaire investor Rakesh Jhunjhunwala adds Canara Bank to his portfolio in Q2 | Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक

Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक

Highlights बँकेच्या सप्टेंबर २०२१ तिमाहीदरम्यान नेट प्रॉफिटमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे.

Canara Bank share: शेअर बाजाराच्या तेजीत बँकिंग क्षेत्रातील कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी आली आहे. या बँकिंग स्टॉकमध्ये गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. कॅनरा बँकेचे सप्टेंबर तिमाहीचे निकालही अपेक्षेपेक्षा चांगले असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा जवळपास तिपटीने वाढून १३३३ कोटी रुपये झाला आहे. तर, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत बँकेला ४४४ कोटींचा नफा झाला होता. बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये कॅनरा बँकेचाही (Canara bank shares share market) समावेश आहे. झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत प्रथमच या बँकेतील हिस्सा खरेदी केला आहे.

कॅनरा बँकेच्या समभागांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या बँकेचे शेअर्स घेतलेल्यांचे पैसे तब्बल दुप्पट झाले आहेत. गेल्या एका वर्षात कॅनरा बँकेने १२८ टक्के बंपर रिटर्न दिला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक ५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शेअरची किंमत २०० रुपयांच्या वर होती. 

झुनझुनवालांचीही गुंतवणूक
शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनीदेखील कॅनरा बॅकेत पहिल्यांदा गुंतवणूक केली आहे. त्यांनी सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीदरम्यान पर्सनल कॅपॅसिटीमध्ये १.६ टक्के (२९,०९७,४००) शेअर्स खरेदी केले. २७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान त्यांचं मूल्य ५८१.८ कोटी रूपये होतं.

Web Title: Billionaire investor Rakesh Jhunjhunwala adds Canara Bank to his portfolio in Q2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.