Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात श्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ, जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला भारत

देशात श्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ, जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला भारत

अब्जाधीशांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 07:16 PM2022-03-01T19:16:10+5:302022-03-01T19:16:32+5:30

अब्जाधीशांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

billionaire population grows 11% in India, globally India ranks third in the world | देशात श्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ, जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला भारत

देशात श्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ, जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला भारत

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारतात अब्जाधीशांची संख्या(Billionaires in India) झपाट्याने वाढली आहे. विशेषत: हाय नेटवर्थ इंडिव्हिजुअल्स अतिशय वेगाने वाढत आहेत. मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ व्यक्तींमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यांची संख्या 13 हजार 637 झालीये.

भारत तिसऱ्या स्थानावर
अब्जाधीशांच्या बाबतीत भारत सध्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 748 अब्जांसह अमेरिका पहिल्या, 554 अब्जांसह चीन दुसऱ्या आणि 145 अब्जांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिजुअल्सची संख्या 2020 मध्ये 12287 वरुन 2021 मध्ये 13637 पर्यंत वाढली आहे.

मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक यांनी त्यांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी जगभरातील अतिउच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या संख्येत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संख्या 610569 आहे. 2020 मध्ये त्यांची संख्या 558828 होती. या अहवालानुसार, ज्या लोकांची संपत्ती $30 दशलक्ष म्हणजेच 225 कोटी किंवा त्याहून अधिक आहे, ते HNI श्रेणीत येतात.

एचएनआय बंगळुरुमध्ये सर्वात वेगाने वाढतात
शहरांबद्दल बोलायचे तर, बंगळुरूमध्ये HNI मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तेथे त्यांची संख्या 17.1 टक्क्यांनी वाढली आणि ती 352 झाली. दिल्लीतील एचएनआयची संख्या 12.4 टक्क्यांनी वाढून 210 झाली आहे. मुंबईत त्यांच्या संख्येत 9 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1596 झाली आहे.

2026 पर्यंत एचएनआयची संख्या 19 हजारांच्या पुढे जाईल
अहवालात असे म्हटले आहे की, 2026 पर्यंत अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्तींची संख्या 39 टक्क्यांनी वाढेल आणि त्यांची एकूण संख्या 19006 पर्यंत जाईल. 2016 मध्ये, भारतात केवळ 7401 उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्ती होत्या.
 

Web Title: billionaire population grows 11% in India, globally India ranks third in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.