Lokmat Money > बिझनेस न्यूज > Billionaires List: Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा

Billionaires List: Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा

Bloomberg Index नुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:53 AM2023-02-28T10:53:04+5:302023-02-28T10:59:35+5:30

Bloomberg Index नुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Billionaires List: Elon Musk becomes world's richest person once again; How much Ambani-Adani? Read on | Billionaires List: Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा

Billionaires List: Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा

नवी दिल्ली - जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. टेस्ला सीईओ एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत झालेल्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत नंबर वनवर असणारे फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अनॉल्ट(Bernard Arnault) दुसऱ्या क्रमांकावर खाली घसरले आहेत. 

एका दिवसांत वाढली इतकी संपत्ती  
Bloomberg Index नुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे मस्क यांनी बर्नार्ड यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. मागील काही दिवसांपासून मस्क यांच्या संपत्तीत होणारी वाढ पाहता ते लवकरच जगातील सर्वात श्रीमंत बनतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

डिसेंबरला २ नंबरवर घसरले
टॉप १० अब्जाधीशांमध्ये २०२१ मध्ये सातत्याने नंबर १ टिकवून ठेवणारे एलन मस्क यांना मागील डिसेंबर २०२२ मध्ये बर्नार्ड अनॉल्ट यांनी मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. २०२२ हे वर्ष एलन मस्क यांच्यासाठी संघर्षाचे ठरले. ४४ अब्ज डॉलरची ट्विटरसोबत डिल झाल्यानंतर एलन मस्क यांची संपत्ती वर्षाच्या सुरुवातीपासून घटण्यास सुरु झाली. वर्षाअखेरपर्यंत ही घसरण सुरूच होती. 

मस्क यांची कमाई
गेल्या वर्षी जिथे एलन मस्क सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीत शीर्षस्थानी होते, त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे संपत्तीही वाढली. या वर्षी आतापर्यंत एलन मस्कच्या संपत्तीत ५०.१ अब्ज डॉलर वाढ नोंदवण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत २३.३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

टेस्ला शेअर्स ५% पेक्षा वाढले
एलन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. टेस्लाच्या शेअरची किंमत शेवटच्या ट्रेडिंग दिवशी प्रति शेअर २०७.६३ डॉलरच्या पातळीवर पोहोचली. मस्कच्या कंपनीच्या शेअरमध्ये ५.४६ टक्के किंवा प्रति शेअर १०.७५ डॉलर वाढ झाली. ट्विटरसोबत डील सुरू झाल्यापासून त्यात मोठी घसरण झाली होती, त्यानंतर ती बराच काळ सुरू होती.

मुकेश अंबानी टॉप-१० मध्ये कायम तर अदानी...
श्रीमंतांच्या यादीत, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सातत्याने टॉप-१० मध्ये स्थान कायम ठेवले आहे. ८१.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, रिलायन्सचे चेअरमन जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ६४६ मिलियन डॉलरची घट झाली आहे. लॅरी पेज ८४.७ अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे, तर कार्लोस स्लिम हेलू ८३.२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम अदानी ३७.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहेत. 
 

Web Title: Billionaires List: Elon Musk becomes world's richest person once again; How much Ambani-Adani? Read on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.