मुंबई : गौतम थापर प्रवर्तित सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स कंपनीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
कंपनीने मंगळवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. एका स्वतंत्र विधि संस्थेने केलेल्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यवहारांच्या माध्यमातून हा घोटाळा केला. सीजी पॉवरची हजारो कोटींची देणेदारी आणि कंपनीने इतरांना दिलेला अग्रीम (अॅडव्हान्सेस) निधी ताळेबंदात दाखविण्यातच आलेला नसल्याचे आढळून आले आहे.
घोटाळ्याचे वृत्त आल्यानंतर सीजी पॉवरचे समभाग २0 टक्क्यांनी घसरले. कंपनीत भागीदारी असलेल्या बँका व संपत्ती व्यवस्थापन संस्थांचे समभागही घसरले. सीजी पॉवरमधील सामान्य लोकांची गुंतवणूक आता अडकून पडली आहे. कंपनीतून बाहेर पडणे आता त्यांना शक्य होणार नाही.
सीजी पॉवरने शेअर बाजारात सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले आहे की, ३१ मार्च २0१८ रोजीच्या आकडेवारीनुसार, कंपनी आणि समूहाचे ताळेबंदात न दाखविलेले कर्ज अनुक्रमे १,0५३.५४ कोटी आणि १,६0८.१७ कोटी अंदाजे असू शकते. १ एप्रिल २0१७ रोजी ते अनुक्रमे ६0१.८३ कोटी आणि ४0१.८३ कोटी रुपये होते.
१00 टक्के हिस्सेदारी गहाण
सीजी पॉवरच्या प्रवर्तकांनी आपली सर्व १00 टक्के हिस्सेदारी गहाण ठेवलेली आहे. कंपनीत १३ टक्के हिस्सेदारी असलेल्या येस बँकेचे समभाग ७.१ टक्क्यांनी घसरले. गहाण समभाग ताब्यात घेऊन ही हिस्सेदारी बँकेने मिळविली होती. कंपनीच्या इतर मोठ्या भागधारकांत एचडीएफसी एमएफ, आदित्य बिर्ला एमएफ, फ्रँकलीन टेम्पलटन, एलआयसी, रिलायन्स कॅपिटल आणि आयडीएफसी स्टर्लिंग फंड यांचा समावेश आहे.
सीजी पॉवरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; समभाग २०% घसरले
एका स्वतंत्र विधि संस्थेने केलेल्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यवहारांच्या माध्यमातून हा घोटाळा केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:10 AM2019-08-22T00:10:57+5:302019-08-22T00:11:24+5:30