महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पुन्हा एकदा टॅलेंटला विशेष सन्मान दिला आहे. दिव्यांग बिरजू रामला नोकरी देत, ‘प्रत्येकाला एका ब्रेकचा अधिकार आहे,’ असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.
सुरू होत्या ‘निगेटिव्ह’ गप्पा... -
बिरजूला देण्यात आलेल्या नोकरीशी संबंधित फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, यूट्यूबवर त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. यात त्याच्यासंदर्भात अनेक नकारात्मक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. पण मी राम आणि महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीचे आभार मानतो, कारण बिरजू रामला दिल्लीतील आमच्या इलेक्ट्रिक वाहन यार्डमध्ये नोकरी मिळाली आहे. प्रत्येकाला एका ब्रेकचा अधिकार आहे....
‘फटफटी’ चलावत होता बिरजू -
आनंद महिंद्रा याना कही महिन्यांपूर्वी त्यांच्या ट्विटर टाईमलाइनवर बिरजूचा व्हिडिओ दिसला. यात बिरजू एक वाटसरुला त्याची 'मोटारसायकल' आणि 'अॅक्टिव्हा' च्या इंजीनचे कॉम्बिनेशन करून तयार केलेल्या 'फटफटी रिक्षा' संदर्भात सांगत आहे. विशेष म्हणजे बिरजू दोन्ही हात आणि पायांनी अपंग आहे. बिरजूचे दुसरे नाव मोहम्मद अस्लम असे अहे.
There have been many follow up videos and negative ‘revelations’ about this gentleman on YouTube But I want to thank Ram and @Mahindralog_MLL for employing Birju Ram at one of our EV charging yards in Delhi. EVERYONE deserves a break… https://t.co/pBpH6TpgnBpic.twitter.com/mJHYKvjzBZ
— anand mahindra (@anandmahindra) February 2, 2022
महिंद्राही झाले ‘कायल’... -
दिव्यांग बिरजूचे स्पिरिट पाहून आनंद महिंद्रा अत्यंत प्रभावित झाले. बिरजूचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, 'या व्यक्तीची क्षमता आणि स्पिरिटने मी कायल झालो आहे. तो केवळ अपंगत्वाशी लढ नाही, तर त्याच्याकडे जे काही आहे, त्यात तो खूप आनंदी आहे. राम, महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये आपण त्याला लास्ट माईल डिलिव्हरीसाठी बिझनेस असोसिएट बनवू शकतो?
Received this on my timeline today. Don’t know how old it is or where it’s from, but I’m awestruck by this gentleman who’s not just faced his disabilities but is GRATEFUL for what he has. Ram, can @Mahindralog_MLL make him a Business Associate for last mile delivery? pic.twitter.com/w3d63wEtvk
— anand mahindra (@anandmahindra) December 27, 2021