आदित्य बिर्ला समूह (Aditya Birla Group) ब्रँडेड दागिन्यांच्या रिटेल व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी समूह जवळपास ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नॉव्हेल ज्वेल्स (Novel Jewels) नावाच्या नवीन व्हेन्चर अंतर्गत हा व्यवसाय केला जाणार असल्याचं समूहाकडून जाहीर करण्यात आलेय. बिर्ला समूह आपल्या इन-हाउस ब्रँडसह संपूर्ण भारतात लार्ज फॉरमॅट ज्वेलरी रिटेल स्टोअर्स (Jewellery Retail Stores) स्थापन करेल. पेंट्स आणि बिल्डिंग मटेरियलसाठी B2B ई-कॉमर्स नंतर गेल्या दोन वर्षात ग्रुपची ही तिसरी नवी बिझनेस एन्ट्री आहे.
फायबरपासून फायनॅन्शिअल सेवांपर्यंतच्या व्यवसायात गुंतलेल्या या समूहाला दागिन्यांमध्ये राष्ट्रीय ब्रँड तयार करायचा आहे. समूहाचा ब्रँड टाटांच्या तनिष्क, कल्याण ज्वेलर्स आणि जोआलुक्कास यांसारख्या विद्यमान प्रस्थापित कंपन्यांशी स्पर्धा करेल. "हा एक रणनितीक पोर्टफोलियो पर्याय आहे, जो आम्ही ग्रोथ इंजिन सुरू करणं आणि बायब्रंट कंझ्युमर लँडस्केपमध्ये आमचा विस्तार करेल," अशी प्रतिक्रिया आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली.
नवी लीडरशीप टीम करणार ऑपरेट
बिर्ला समूहाच्या ब्रँडेड ज्वेलरी रिटेल उपक्रमाचे नेतृत्व नव्याने नियुक्त केलेल्या लीडरशीप टीमकडून केलं जाईल. त्यांच्याकडे उत्तम रिटेल आणि कॅटरेगरी एक्सपर्टीज असतील. भारताचे रत्न आणि दागिन्यांच्या बाजारपेठेचा एकूण जीडीपीमध्ये ७ टक्के वाटा आहे.