Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:09 IST2025-03-27T17:09:51+5:302025-03-27T17:09:51+5:30

BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

bis raids amazon and flipkart warehouse seized fake products | अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

BIS raids on Amazon and Flipkart : आपल्याला काहीही ऑनलाईन ऑर्डर करायचं झालं तर पहिल्यांदा आपण अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या वेबसाईट्स चाळतो. पण, अशा ई कॉमर्स साईट्सवरुन तुम्ही नकली सामान तर खरेदी करत नाही ना? हे सांगायचं कारण म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापे टाकले. यामध्ये अनेक दर्जाहीन आणि प्रमाणपत्रे नसलेली उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. १५ तास चाललेल्या या कारवाईत BIS अधिकाऱ्यांनी सुमारे ७० लाख रुपये किमतीचे गिझर आणि फूड मिक्सरसह ३,५०० हून अधिक इलेक्ट्रिकल उत्पादने जप्त केली.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट रडारवर
ग्राहकांचे हित लक्षात घेत गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी BIS द्वारे देशव्यापी मोहिम चालवली जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, लखनौ आणि श्रीपेरंबदूरसह अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते.

सध्या, ७६९ उत्पादन श्रेणींना भारतीय नियामकांकडून अनिवार्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. योग्य परवान्याशिवाय या वस्तूंची विक्री किंवा वितरण केल्यास २०१६ च्या BIS कायद्यानुसार संभाव्य कारावास आणि दंडासह कायदेशीर दंड होऊ शकतो. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने या छाप्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी बीआयएसने लखनौमधील अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामावरही छापा टाकून बनावट वस्तू जप्त केल्या होत्या.

वाचा - प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये 'हे' लोक कधीही साक्षीदार होऊ शकत नाही; काय सांगतो कायदा?

ऑनलाईन ऑर्डर करताना काय काळजी घ्यावी?

  • अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा : शक्य असल्यास, अधिकृत विक्रेत्याकडून किंवा अधिकृत वेबसाइटवरून वस्तू खरेदी करा.
  • उत्पादनाची किंमत तपासा : जर उत्पादनाची किंमत खूप कमी असेल, तर ते नकली असण्याची शक्यता आहे.
  • उत्पादनाची गुणवत्ता तपासा : उत्पादनाची गुणवत्ता, जसे की वस्तूचा दर्जा आणि पॅकेजिंग तपासा.
  • उत्पादनाची वैशिष्ट्ये तपासा : उत्पादनाची वैशिष्ट्ये, जसे की लोगो, लेबल आणि सीरियल नंबर तपासा.
  • ग्राहक रिव्ह्यू वाचा : इतर ग्राहकांनी उत्पादनाबद्दल काय म्हटले आहे ते वाचा.

Web Title: bis raids amazon and flipkart warehouse seized fake products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.