Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bisleriची होणार होती विक्री, टाटासोबतची मोडली डील, आता जयंती चौहान यांनी घेतला मोठा निर्णय 

Bisleriची होणार होती विक्री, टाटासोबतची मोडली डील, आता जयंती चौहान यांनी घेतला मोठा निर्णय 

Bisleri: देशातील सर्वात मोठी बाटलीबंदा पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी इंटरनॅशनलने कोका-कोला, पेप्सी, स्प्राईटसारख्या कोल्ड ड्रिंक्स ब्रँड्सना टक्कर देण्याची तयारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:11 PM2023-05-30T20:11:02+5:302023-05-30T20:11:43+5:30

Bisleri: देशातील सर्वात मोठी बाटलीबंदा पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी इंटरनॅशनलने कोका-कोला, पेप्सी, स्प्राईटसारख्या कोल्ड ड्रिंक्स ब्रँड्सना टक्कर देण्याची तयारी केली आहे.

Bisleri was going to be sold, the deal with Tata fell through, now Jayanthi Chauhan has taken a big decision | Bisleriची होणार होती विक्री, टाटासोबतची मोडली डील, आता जयंती चौहान यांनी घेतला मोठा निर्णय 

Bisleriची होणार होती विक्री, टाटासोबतची मोडली डील, आता जयंती चौहान यांनी घेतला मोठा निर्णय 

देशातील सर्वात मोठी बाटलीबंदा पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी इंटरनॅशनलने कोका-कोला, पेप्सी, स्प्राईटसारख्या कोल्ड ड्रिंक्स ब्रँड्सना टक्कर देण्याची तयारी केली आहे. तसेच त्यासाठी कार्बोनेटेड शितपेयांसाठी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. मंगळवारी कंपनीने आपल्या एका निवेदनात सांगिलते की, संपूर्ण भारतामध्ये उन्हाळ्याचा प्रकोप वाढत आहे. कंपनीने चार फ्लेव्हरमध्ये आपलं ड्रिंक्स बाजारात आणलं आहे. 

बिसलेरी कंपनीने ज्या चार फ्लेवरमध्ये कोल्ड ड्रिंक्स लाँच केलं आहे, त्यामध्ये रेव, पॉव आणि स्पाय जीरा या सब ब्रँड्सचा समावेश आहे. बाटलीबंद पाण्यासोबत बिसलेरी आधीपासूनच आपल्या लिमोनाटा ब्रँड्स अंतर्गत कार्बोनेटेड ड्रिंक्सची विक्री करते. ग्राहकांना फिज कोला, ऑरैंज, लेमक आणि जीरा कॅटॅगरीमधील फ्लेवर टेस्ट या कोल्ड ड्रिंक्समधून मिळावा, असा कंपनीचा प्रयत्न आहे. देशामध्ये कोल्ड ड्रिंक्सचं मार्केट खूप मोठं आहे. तसेच आधीपासूनच कोका-कोला आणि पेप्सिको यांसारख्या कंपन्यांनी या बाजारावर आपलं वर्चस्व राखलं आहे. आता यामध्ये बिसलेरी इंटरनॅशनलचं नावही जोडलं जाणार आहे.

गतवर्षी २०२२ मध्ये बिसलेरी इंटरनॅशनला विकण्याची पूर्ण तयारी या कंपनीच्या मालकांनी केली होती. तसेच देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगसमूह असलेल्या टाटा उद्योग समुहाने बिसलेरी कंपनी खरेदी करण्याची पूर्ण तयारी केली होती. बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांनी आपल्या उत्तराधिकारी नसल्याने आणि वाढत्या वयामुळे कंपनी विक्री कऱण्याचा निर्णय घेतला होता. बिसलेरी कंपनी खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सूक होत्या. मात्रा टाटा कन्झ्युमरसोबत त्याचा सौदा जवळपास निश्चित झाला होता. मात्र ऐनवेळी चर्चा फिस्कटली आणि हा व्यवहार अर्ध्यातच मोडला. 

Web Title: Bisleri was going to be sold, the deal with Tata fell through, now Jayanthi Chauhan has taken a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.