नवी दिल्ली: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यानंतर बिटकॉइनने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता एलन मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे बिटकॉइन गडगडले असून, सर्वांत नीचांकी स्तरावर आले आहे. (bitcoin dropped 17 percent after elon musk tweet about tesla inc)
कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवसस्थेत मंदी असताना बिटकॉइनची किंमत मात्र सातत्याने वाढत राहिली. या काळात जगातल्या अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. टेस्लाच्या एलन मस्कनेही यामध्ये १.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. त्यानंतर बिटकॉइनच्या किंमतीत वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, आता एलन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम बिटकाइनवर दिसून आला.
जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?
टेस्ला कार खरेदीसाठी बिटकॉइनचा वापर नाही
टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉइनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉइन वापराचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे. तशा प्रकारची घोषणा एलन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे. परंतु, पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करणार नाही, असे एलन मस्क यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.
Tesla & Bitcoin pic.twitter.com/YSswJmVZhP
— Elon Musk (@elonmusk) May 12, 2021
क्रिप्टोकरन्सी ही चांगली कल्पना
टेस्लाची कार आता बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करता येणार नाही. बिटकॉइनचा वापर हा पारंपरिक इंधनांच्या व्यवहारांसाठी विशेषत: कोळशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. कोळसा हा कार्बन उत्सर्जनाचे सर्वात मोठे आणि वाईट माध्यम आहे, असे ट्विट एलन मस्क यांनी केले आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे. भविष्यातील क्रिप्टोकरन्सीचे ते एक आघाडीचे माध्यम असेल. पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची मोठी किंमत मोजून आपण त्याचा वापर करू शकत नाही, असे मस्क यांनी नमूद केले आहे. एलन मस्क यांच्या बिटकॉइन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किमती १७ टक्क्यांनी घसरल्याचे सांगितले जात आहे.
दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन
दरम्यान, जगभरातील अनेक देश बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करत असले तरी, भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही, असे केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.