Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 11:19 AM2018-10-11T11:19:07+5:302018-10-11T11:38:16+5:30

हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

Bitcoin Exchange made bigger scam than Neerav Modi | नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

नवी दिल्ली -  हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या सायफर ट्रेसने केलेल्या दाव्यानुसार क्रिप्टोकरंसी एक्सेंजरांनी 2009 पासून सुमारे 18 हजार कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचे लाँड्रिंग केले आहे.  हे क्रिप्टो करंजी एक्सचेंजर्स भारताबाहेर असून, जे भारतातून मनी लाँड्रिंग करत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणार कुठलाही मनी लाँड्रिंग कायदा अस्तित्वात नाही. 

वरील 1800 हजार कोटींच्या व्यवहारांमध्ये सायफर ट्रेसने नजर ठेवलेल्या आपराधिक आणि अतिशय संशयास्पद व्यवहारांचाच समावेश आहे. सायफर ट्रेसने आघाडीच्या 20 क्रिप्टोकरंसी एक्सचेंजच्या माध्यमातून झालेल्या तब्बल 35 कोटी व्यवहारांची पडताळणी केली. तसेच त्यापैकी दहा कोटी व्यवहारांची दुसऱ्या पक्षांशी जुळवणूक करून पाहिली. या एक्सचेंजचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करण्यात आलेल्या 2 लाख 36 हजार 979 बिटकॉइन्सच्या वापरासाठी झाला होता. सायफर ट्रेसने मनी लाँड्रिंगशिवाय हॅकिंग आणि क्रिप्टोकरंसीच्या चोरीचाही छडा लावला आहे. 

 2018 च्या सुरुवातीच्या 9 महिन्यांमध्ये हॅकिंग एक्सचेंजच्या माध्यमातून 92 कोटी 70 लाख डॉलर (सुमारे 68 अब्ज रुपये) मूल्याच्या व्हर्चुअल करंसीची चोरी झाली होती. ही चोरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 250 टक्क्यांनी अधिक होती. दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नियुक्त केलेली समिती सरकारला स्वत:ची क्रिप्टोकरंसी आणण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.  

Web Title: Bitcoin Exchange made bigger scam than Neerav Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.