Join us

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दणका? सरकारने पाठवली नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 10:29 PM

गेल्या काही काळापासून बिटकॉइन या व्हर्च्युअल करंसीने अर्थजगतात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, बिटकॉइनसह क्रिप्टोकरंसींमध्ये व्यवहार करणाऱ्या हजारो जणांना केंद्र सरकारने करासाठी नोटीस पाठवली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही काळापासून बिटकॉइन या व्हर्च्युअल करंसीने अर्थजगतात धुमाकूळ घातला आहेबिटकॉइनसह क्रिप्टोकरंसींमध्ये व्यवहार करणाऱ्या हजारो जणांना केंद्र सरकारने करासाठी नोटीस पाठवली आहेदेशभरात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये  गेल्या 17 महिन्यांमध्ये 3.5 अब्ज डॉलरचे व्यवहार झाल्याची माहिती

नवी दिल्ली -  गेल्या काही काळापासून बिटकॉइन या व्हर्च्युअल करंसीने अर्थजगतात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, बिटकॉइनसह क्रिप्टोकरंसींमध्ये व्यवहार करणाऱ्या हजारो जणांना केंद्र सरकारने करासाठी नोटीस पाठवली आहे. देशभरात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये  गेल्या 17 महिन्यांमध्ये 3.5 अब्ज डॉलरचे व्यवहार झाल्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून दिलेली आहे. दरम्यान, ही आकडेवारी समोर आल्यानंतर सरकारने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, बंगळुरू, मुंबई, दिल्लीसह 9 ठिकाणांहून माहिती गोळा केल्यानंतर या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. बिटकॉइनसह अन्य व्हर्च्युअल करंसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये टेक सॅव्ही तरुण, रियल इस्टेट व्यावसायिक आणि ज्वेलर्सचा समावेश असल्याचे, टॅक्स अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  कसे खरेदी करता येतात बिटकॉइनबिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. आरबीआयने बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अद्याप मान्यता दिली गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत व्हर्चुअल करन्सीत ट्रेड करणं धोकादायक ठरु शकतं. गेल्या आठवड्यात एका बिटकॉईनचे मूल्य तब्बल 11 हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. आज हे मूल्य 12 हजार डॉलर्सवर पोहोचलं आहे. 

बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी?रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेल्या व्यवसायाला बिटकॉईनच्या माध्यमातून पुन्हा बहर आण्याचे प्रयत्न सुरू झाले तर या व्यवसायावरील मंदीचे सावट ब-यापैकी दूर होईल, असा विचार करून या क्षेत्रात मोठया व्यावसायिकांनी काही प्रयत्न सुरू केल्याचा सुगावा लागताच, सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे बिटकॉईनचा वापराचे केंद्र गुजरातमध्ये अहमदाबाद येथे असल्याचे समजताच ईडीने दोन ठिकाणी धाडी घातल्याची माहितीही हाती आली आहे.

टॅग्स :बिटकॉइनकरसरकारभारत