नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक विशिष्ट कार्ड घ्यावं लागणार आहे. एटीएम कार्ड क्लोनिंग करून देशभरातून फसवणुकीच्या घटना वाढल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरपासून डेबिट कार्डावरून दिवसाला 20 हजारांची रोख रक्कम काढण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. तसेच आता 20 हजारांहून जास्त पैसे काढू शकता, अशी माहिती एसबीआयचे एमडी पीके गुप्ता यांनी दिली आहे. आम्ही फसवणूक थांबवण्यासाठी दिवसाला 20 हजार रुपयांची मर्यादा घालून दिली होती. तरीही जे ग्राहक दिवसाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू इच्छितात, त्यांनी बँकेतून अधिक पैसे काढता येऊ शकणारं एटीएम कार्ड घ्यावं, असंही पी. के. गुप्तांनी स्पष्ट केलं आहे.
SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 4:20 PM
स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे.
ठळक मुद्देस्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिलीत्यासाठी तुम्हाला बँकेतून एक विशिष्ट कार्ड घ्यावं लागणार आहे. 1 नोव्हेंबरपासून डेबिट कार्डावरून दिवसाला 20 हजारांची रोख रक्कम काढण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती.