सोन्याच्या वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑक्टोबर 2020चे सोन्याचे वायदा बाजार भाव 0.42 टक्क्यांनी म्हणजेच 231 रुपयांनी वाढून 10 ग्रॅम 55,020 रुपयांवर स्थिरावले आहेत. जागतिक पातळीवर सोमवारी सकाळी सोन्याच्या वायद्या भावातही वाढ झाली आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास देशातील वायदा बाजारामध्ये सोमवारी सकाळी त्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली. सोमवारी सकाळी 9.51 वाजता एमसीएक्सवर 4 सप्टेंबर 2020 रोजी चांदीचा वायदा भाव 1.75 टक्क्यांनी म्हणजेच 960 रुपयांनी वाढून 75,120 रुपये प्रतिकिलोवर गेला होता. त्याशिवाय 4 डिसेंबर २०२० रोजी चांदीचा वायदा दर 0.85 टक्क्यांनी म्हणजेच 647 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 76,902 रुपयांवर पोहोचला होता.जागतिक स्तरावर सोन्याचे भावजागतिक स्तराविषयी बोलताना सोमवारी सकाळी सोन्याच्या वायद्यात वाढ झाली आहे आणि स्पॉटच्या किमतीत घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचे वायदा भाव 0.57 टक्के म्हणजेच किंवा 11.60 डॉलर प्रति औंस 2039.60 डॉलरवर गेले. त्याखेरीज सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औंस 2029.65 डॉलर म्हणजेच 0.29 टक्के किंवा 5.90 डॉलर खाली आहे.जागतिक स्तरावर चांदीची किंमतजागतिक पातळीवर सोमवारी पहाटे चांदीच्या वायदा बाजारातील किमतीत वाढ आणि स्पॉटच्या किमतीत घट दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी चांदीचा वायदा भाव कॉमेक्सवर 2.18 टक्के म्हणजेच 0.60 डॉलर प्रति औंस 28.14 डॉलरवर व्यापार करत होता. त्याच वेळी चांदीचा जागतिक बाजारभाव यावेळी 1.01टक्के म्हणजेच 0.28 टक्क्यांनी कमी होऊन प्रति औंस 28.02 डॉलरवर पोहोचला होता.
वायदा बाजारात सोने झाले महाग, चांदीच्या दरातही झाली वाढ; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:52 PM