चर जागा स्वाभिमानीला: भाजपसमोर ताकद दाखविण्याचे आव्हान सोलापूर- 25 वर्षांची युती तुटल्यामुळे सेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे राहिले असून दोन विद्यमान आमदार असलेल्या सोलापूर जिल्?ात भाजपची ताकद वाढविणे आणि जास्त जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान आह़े बरेच तगडे उमेदवार भाजपने उभे केले आहेत़ भाजपचे सुभाष देशमुख, आ़ सिद्रामप्पा पाटील तर मित्र पक्षातील स्वाभिमानी संघटनेचे उत्तम जानकर संजय शिंदे, प्रशांत परिचारक हे साखर कारखानदार आहेत़बर्याच दिवसांपासून दक्षिण सोलापूरच्या जागेचा प्रश्न मिटत नव्हता़ ही जागा भाजपला सोडावी, अशी मागणी होती; मात्र युती तुटल्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. त्यामुळे जोशपूर्ण वातावरणात सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आह़े या मतदारसंघात सुभाष देशमुख आणि आ़ दिलीप माने यांच्यात खरी लढत होईल, असे दिसत़े मोहोळमधील संजय क्षीरसागर यांनी शिवसेनेत उडी घेतली होती; मात्र इथे उमेदवारी मनोज शेजवाल यांना मिळाल्यामुळे ते पुन्हा स्वगृही आले आणि भाजपने त्यांना उमेदवारी देखील दिली़ करमाळ्यातून संजय शिंदे यांनी बर्याच दिवसांपासून प्रचार सुरू केला, त्यामुळे ते विजयर्शी खेचून आणणार का, असा प्रश्न आह़े प्रशांत परिचारक (पंढरपूर), उत्तम जानकर (माळशिरस), संजय पाटील घाटणेकर (माढा) या स्वाभिमानीच्या उमेदवारांनी विद्यमान आमदारांना मोठे आव्हान उभे केले आह़ेशहर उत्तरमधून आ़ विजयकुमार देशमुख भाजपकडून हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत; मात्र येथे त्यांच्याच पक्षातील बंडाळीमुळे त्यांचा विजय अवघड झाला आह़े निम्मे नगरसेवक त्यांच्या विरोधात आहेत, अशीच परिस्थिती शहर मध्यमधील भाजप उमेदवार प्रा़ मोहिनी पत्की यांच्याबद्दल आह़े अक्कलकोटमधून आ़ सिद्रामप्पा पाटील दुसर्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत़ सांगोल्यात र्शीकांत देशमुखांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा किती प्रभाव पडतो हे पहावे लागणार आह़ेकेंद्रात भाजपची सत्ता आल्यामुळे त्या मुद्यावर जिल्?ातील भाजपची ताकद वाढणार का, हा खरा प्रश्न आह़े इन्फो बॉक्स़़भाजपचे उमेदवारशहर मध्य- प्रा़ मोहिनी पत्कीशहर उत्तर- आ़ विजयकुमार देशमुखसोलापूर दक्षिण- सुभाष देशमुखअक्कलकोट- आ़ सिद्रामप्पा पाटीलबार्शी- राजेंद्र मिरगणेमोहोळ- संजय क्षीरसागरसांगोला- र्शीकांत देशमुखमाढा- ‘स्वाभिमानी’चे संजय पाटील-घाटणेकर पंढरपूर- ‘स्वाभिमानी’चे प्रशांत परिचारककरमाळा- ‘स्वाभिमानी’ संजय शिंदेमाळशिरस- ‘स्वाभिमानी’ उत्तम जानकर
सात मतदारसंघात भाजपचे उमेदवार
चार जागा स्वाभिमानीला: भाजपसमोर ताकद दाखविण्याचे आव्हान
By admin | Published: September 28, 2014 10:29 PM2014-09-28T22:29:33+5:302014-09-28T22:29:33+5:30