भाजप नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कार्यशैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. देशातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देत आहेत. आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
15 दिवसांत पेट्रोलियम मंत्र्यासोबतही होणार चर्चा -जैव इंधनावरील सीआयआय परिषदेत संबोधित करताना गडकरी म्हणाले, "मी या विषयावर बांगलादेशचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या मंत्र्यासोबत चर्चा केली आहे. बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एक्त करण्यासाठी भारताकडून इथेनॉल आयात करण्यास उत्सुक आहेत. याच बरोबर 15 दिवसांच्या आतच माझी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत देशात एथेनॉल पंप सुरू करण्यासंदर्भात नीती तयार करण्यावर चर्चा होईल."
एथेनॉलचे भविष्य होणार चांगले -गडकरी म्हणाले, इथेनॉलचे भविष्य अत्यंत चांगले आहे. देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्रीझाल्यास, तेलाच्या किंमती कमी होतील. याचा सर्वाधिक फायदा कार आणि बाईक सारखी वाहने चालवतान होईल. यामुळे प्रदूषण पातळीही कमी केली जाईल. याच बरबोर, सरकार अधिकाधिक इथेनॉल खरेदी करण्यास उत्सुक आहे. तसेच, पर्यायी इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्याबाबतही कटीबद्ध आहे.