Lokmat Money > बिझनेस न्यूज > Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. अशातच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही सोमवारी तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:50 PM2024-06-03T13:50:59+5:302024-06-03T13:58:27+5:30

Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. अशातच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही सोमवारी तेजी दिसून आली.

BJP led NDA gets majority in exit poll lok sabha 2024 investors jump Adani shares surge know details | Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना देशाची कमान मिळणार असल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलचे निकाल लागल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी उसळी पाहायला मिळाली. आज अदानी समूहाच्या ५ कंपन्यांचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये सर्वाधिक १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने मार्केट कॅपमध्ये १.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर अदानी समूहाचे मार्केट कॅप १९.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.
 

अदानी एन्टरप्रायझेस - अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आज ९.७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. कामकाजादरम्यान शेअर ६.९४ टक्क्यांच्या वाढीसह ३६४८ रुपयांवर ट्रेड करत होता.
 

अदानी पोर्ट्स - अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा शेअर ९.५४ टक्क्यांनी वधारून १,५७५ रुपयांवर खुला झाला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. कामकाजादरम्यान हा शेअर १५७८ रुपयांवर ट्रेड करत होता.
 

अदानी पॉवर - समूहातील या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आज १५.६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर उघडताच ८७५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २३०.९५ रुपये आहे.
 

अदानी एनर्जी सोल्युशन - समूहातील या कंपनीचे शेअर १२२८.१० रुपयांच्या पातळीवर उघडले. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत ११.२३ टक्क्यांनी वाढून १२४९ रुपयांवर पोहोचली. जो १२५० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आहे. पण नंतर त्यात थोडी घसरण होऊन शेअर १२२४ रुपयांवर आला.
 

अदानी टोटल गॅस - अदानी समूहाच्या या कंपनीचा शेअर १५.२८ टक्क्यांच्या वाढीसह ११९७.९५ रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर शेअरचा भाव १११४.२५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
 

अदानी विल्मर - बीएसईवर अदानी विल्मरचा शेअर ६ टक्क्यांनी वधारून ३८१.१५ रुपयांवर खुला झाला. त्यानंतर कंपनीचा शेअर ३६७ रुपयांवर आला. कंपनीचे मार्केट कॅप ४७,८८०.१६ कोटी रुपये आहे.
 

एनडीटीव्ही - अदानी समूहाच्या मीडिया क्षेत्रातील या कंपनीत आज १०.८४ टक्के वाढ झाली. बीएसईवर कंपनीचा शेअर २७४.९० रुपयांवर खुला झाला. तर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३०६.५५ रुपये आहे. परंतु कामकाजादरम्यान नंतर यात थोडी घसरण झाली.
 

एसीसी लिमिटेड - या सिमेंट कंपनीच्या शेअरच्या किमतीतही आज तेजी पाहायला मिळाली आहे. कामकाजादरम्यान शेअरचा भाव ६.७२ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक २७१७.४० रुपये आहे. कामकाजादरम्यान शेअर २६६० रुपयांवर आला.
 

अंबुजा सिमेंट्स लिमिटेड - अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आज 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर ६६५.०५ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर ६७६ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
 

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड - या कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स २१०० रुपयांच्या पातळीवर उघडले. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअरचा भाव १३.४९ टक्क्यांनी वाढून २१७३.६५ रुपयांवर पोहोचला. बीएसईवरही हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. नंतर कामकाजादरम्यान शेअर २०४३ रुपयांवर आला.
 

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: BJP led NDA gets majority in exit poll lok sabha 2024 investors jump Adani shares surge know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.