Zydus Cadila आणि तैवानमधील औषध उत्पादन कंपनी TLC नं बुधवारी mucormycosis च्या (ब्लॅक फंगस) उपचारासाठी आवश्यत असलेलं औषध Liposomal Amphotericin B च्या विक्रीसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती दिली. Zydus cadila आता भारतात या औषधाची विक्री करणार आहे.
TLC AmphoTLC नॉन एक्स्क्लुसिव्ह बेसिसवर निर्मिती आणि Zydus ला औषधाचा पुरवठा करेल. यानंतर Zydus भारतात या औषधाची विक्री करणार आहे. "भारतात ब्लॅक फंगसच्या उपचारांवरील औषधाची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी आम्ही या महत्त्वपूर्ण औषध भारताता तात्काळ उपलब्ध करून देत आहोत," असं Cadila हेल्थकेअरचे एमडी शारविल पटेल यांनी सांगितलं.
"सध्या या संकटाचा सामना सुरक्षित आणि प्रभावी औषधोपचारासोबत लढून करायचा आहे," असंही पटेल म्हणाले. AmphoTLC ची पहिली खेप लगेचच पोहोचवली जाणार आहे तसंच त्याची आवश्यकता पडल्यास तात्काळ वापर करण्यास मदत होईल, असं मत TLC चे अध्यक्ष जॉर्ज येह यांनी व्यक्त केलं. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायझेशननं TLC ने Amphotericin B Liposome साठी मंजुरी दिली आहे. तसंत सध्या ब्लॅग फंगसच्या वाढत्या प्रकरणांमुळे AmphoTLC देशात Liposomal Amphotericin B कमतरता भरून काढेल, असं Zydus Cadila नं सांगितलं.
Black Fungus Treatment: ब्लॅक फंगसच्या औषधासाठी Zydus Cadila, TLC मध्ये करार; आता भारतात होणार औषधाची विक्री
Zydus Cadila आणि TLC नं भारतात mucormycosis च्या उपचारासाठी आवश्यक औषध Liposomal Amphotericin B च्या विक्रीसाठी केला करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:47 PM2021-05-26T17:47:48+5:302021-05-26T17:51:00+5:30
Zydus Cadila आणि TLC नं भारतात mucormycosis च्या उपचारासाठी आवश्यक औषध Liposomal Amphotericin B च्या विक्रीसाठी केला करार
Highlightsmucormycosis च्या उपचारासाठी आवश्यक औषध Liposomal Amphotericin B च्या विक्रीसाठी केला करारलवकरच भारतात उपलब्ध होणार औषध