Lokmat Money > बिझनेस न्यूज > काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती

काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती

काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत जुलैमध्ये घोषणा केलेल्या व्यक्तींना कर विभाग ३० आॅगस्टपर्यंत याबाबतची पोचपावती देणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2016 01:01 AM2016-08-16T01:01:26+5:302016-08-16T01:01:26+5:30

काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत जुलैमध्ये घोषणा केलेल्या व्यक्तींना कर विभाग ३० आॅगस्टपर्यंत याबाबतची पोचपावती देणार आहे.

Black Money Accepts Announcing | काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती

काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती

नवी दिल्ली : काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत जुलैमध्ये घोषणा केलेल्या व्यक्तींना कर विभाग ३० आॅगस्टपर्यंत याबाबतची पोचपावती देणार आहे.
उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत (आयडीएस) सरकारने कर आणि दंड जमा करण्याचा अवधी वाढविला आहे. त्यासाठी फॉर्म २ मध्ये आवश्यक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून (सीबीडीटी) काळ्या पैशांची घोषणा केल्यानंतर देण्यात येणारी ही पोचपावती आहे. आयडीएस नियमांनुसार संपत्तीची घोषणा करणाऱ्या व्यक्तीला १५ दिवसांच्या आत याबाबतची पोचपावती द्यावी लागते. आयकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, आयडीएसमध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार ही मुदत १५ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. सरकारने आयडीएस योजनेची सुरुवात १ जून रोजी केली होती. या योजनेनुसार नागरिक काळ्या पैशांची घोषणा ३० सप्टेंबरपर्यंत करू शकतात. एकूण संपत्तीच्या ४५ टक्के कर, अधिभार आणि दंड यासाठी द्यावा लागेल. (वृत्तसंस्था)

दंडाची कालमर्यादा वाढवली
व्यापाऱ्यांसाठी आयडीएस अंतर्गत कर आणि दंड देण्याची कालमर्यादा वाढविण्यात आली आहे. अशा नागरिकांसाठी कर आणि दंड तीन टप्प्यांत ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत देण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयडीएस योजनेनुसार नागरिक काळ्या पैशांची घोषणा ३० सप्टेंबरपर्यंत करू शकतात.

Web Title: Black Money Accepts Announcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.