नवी दिल्ली : परदेशात असलेला कुणाचा काळा पैसा, देश-विदेशात असलेली भारतीयाची बेनामी संपत्ती आणि एखाद्याने केलेली करचोरी यांची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. करचोरी व काळ्या धनाला आळा घालण्यासाठी ही योजना आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न भाषणापुरतेच राहिले आहे. आता काळा पैसा, करचोरी उघड करणाऱ्यांसाठी बक्षीस देणारी योजना केंद्रीय प्रत्यक्ष कर (सीबीडीटी) मंडळ आणणार आहे.
करचोरी करणाºयाची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्याची सुविधा सध्याही आहे. कर मूल्यमापन याचिकेद्वारे (टीईपी) सर्वसामान्य नागरिकही एका अर्जाद्वारे माहिती देऊ शकतो, अशी माहिती देणाºयाला बक्षिस देण्याचा नियम २००७ मध्ये प्राप्तिकर कायद्यात अंतर्भूत करण्यात आला. पण आता हा नियम रद्द करुन त्याऐवजी बक्षिसाची नवीन योजना आणण्याचा सीबीडीटीचा विचार आहे.
कोणत्या माहितीसाठी किती बक्षीस?
परदेशातील काळा पैसा
5
कोटीपर्यंत बक्षीस
बेनामी संपत्ती
1
कोटीपर्यंत बक्षीस
करचोरीची माहिती
50
लाख रुपये बक्षीस
काळा पैसा, बेनामी संपत्ती दाखवा, करोडपती व्हा!
परदेशात असलेला कुणाचा काळा पैसा, देश-विदेशात असलेली भारतीयाची बेनामी संपत्ती आणि एखाद्याने केलेली करचोरी यांची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तर तुम्ही करोडपती होऊ शकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:30 AM2018-06-02T06:30:07+5:302018-06-02T06:30:07+5:30