नवी दिल्ली : काळा पैसा घोषणा योजना संपायला ११ दिवस शिल्लक असताना कर विभागाकडून बेहिशोबी मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. मालमत्ता उघड केल्यास संपूर्ण गोपनीयता पाळण्याची हमी त्यात दिली आहे.
काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने काळा पैसा घोषणा योजना आणली आहे. या योजनेत ४५ टक्के कर आणि दंड भरून कारवाई टाळण्याची तरतूद आहे. ३0 सप्टेंबरला योजनेची मुदत संपत आहे. तथापि, या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कराचा मोठा दर आणि गोपनीयतेबाबत संशय ही त्यामागची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) हे एसएमएस पाठविले आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काळा पैसा; सीबीडीटीकडून एसएमएस
काळा पैसा घोषणा योजना संपायला ११ दिवस शिल्लक असताना कर विभागाकडून बेहिशोबी मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे
By admin | Published: September 21, 2016 05:11 AM2016-09-21T05:11:14+5:302016-09-21T05:11:14+5:30