Lokmat Money > बिझनेस न्यूज > 500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल!

500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल!

जर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर ते काळ्या तांदळाचे उत्पादन घेऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 06:27 PM2023-05-25T18:27:52+5:302023-05-25T18:30:03+5:30

जर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर ते काळ्या तांदळाचे उत्पादन घेऊ शकतात.

black rice cultivation how to cultivate black rice | 500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल!

500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल!

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. यानंतर शेतकरी भातशेतीकडे वळतील. मात्र, अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी भात पिकाची नर्सरी (रोपवाटिका) तयार करण्यास सुरुवात केली आहे. सर्व राज्यांमध्ये शेतकरी विविध प्रकारच्या धानाच्या रोपवाटिका तयार करत आहेत. जर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर ते काळ्या तांदळाचे उत्पादन घेऊ शकतात.

काळ्या तांदळाला ब्लॅक राइस किंवा ब्लॅक पॅडी असेही म्हणतात. या तांदळाचा दर बासमतीपेक्षा खूप जास्त आहे. शेतकऱ्यांनी एक हेक्टरमध्ये काळ्या भाताची लागवड केल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. या दिवसांतही बाजारात काळ्या तांदळाची मागणी वाढली आहे. काळा तांदूळ हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. त्यात कर्करोगविरोधी घटक आढळतात. याशिवाय, काळ्या तांदळात लोह, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. 

अशा परिस्थितीत जर तुम्ही काळ्या तांदळाचे सेवन केले तर तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल. काळ्या भाताची लागवड मुख्यतः ईशान्य भागात केली जाते. मात्र, आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शेतकरी त्याची लागवड करत आहेत. विशेष म्हणजे काळा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा रंग बदलतो. त्यामुळे त्याला निळा तांदूळ असेही म्हणतात.

दरम्यान, काळ्या तांदळाचे उत्पादन सर्वात आधी चीनमध्ये सुरू झाले. यानंतर ते भारतात आले. या भात पिकाची लागवड भारतात सर्वप्रथम मणिपूर आणि आसाममध्ये सुरू झाली. त्याची लागवडही सामान्य भाताप्रमाणे केली जाते. काळ्या भाताचे पीक 100 ते 110 दिवसांत तयार होते. याच्या रोपाची लांबी सामान्य भाताइतकीच असते. पण, त्याच्या दाणे लांब असतात. यामुळेच काळ्या तांदळाची लांबी जास्त असते.

काळ्या भाताची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल फायदेशीर!
शेतकऱ्यांनी काळ्या भाताची लागवड सुरू केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. साधारणपणे तांदळाची किंमत 30 रुपये किलोपासून सुरू होते, जी 150 रुपये किलोपर्यंत जाते. मात्र, काळ्या तांदळाची किंमत 250 रुपये किलोपासून सुरू होते. त्याचा जास्तीत जास्त दर 500 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. विशेष म्हणजे अनेक राज्यांमध्ये याच्या लागवडीसाठी सरकारकडून प्रोत्साहनही मिळते. अशा परिस्थितीत काळ्या भाताची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे म्हणता येईल.

Web Title: black rice cultivation how to cultivate black rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.