बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात आला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लहान-मोठ्या व्यावसायिकांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसते. कारण व्हॅलेंटाईन वीकमध्ये बाजारातील अनेक गोष्टींची मागणी वाढली. फुले, केक, कॅटबरी आणि भेटवस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. भेटवस्तूंच्या जोरदार मागणीमुळे प्रेमाचा उत्सव आर्थिक उलाढालीचा ठरला.
दरम्यान, आता 'ब्लिंकिट'ने व्हॅलेंटाईनच्या दिवशी कोणत्या वस्तूची सर्वाधिक ऑर्डर मिळाली, याची माहिती दिली आहे. ब्लिंकिटने एक दिवसाचा डेटा शेअर करून ग्राहकांसह नेटकऱ्यांची फिरकी घेतली. व्हॅलेंटाईन डे दिवशी टेडी बेअरची मागणी 'टेडी डे'च्या मागणीपेक्षा जास्त होती, असे ब्लिंकिटचे संस्थापक आणि सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ही आकडेवारी शेअर केली आहे.
We have never seen more searches for "handcuffs" on blinkit than today 😂
— Albinder Dhindsa (@albinder) February 14, 2024
Last stat for today (a lot of folks here have been waiting for this one😂) -
— Albinder Dhindsa (@albinder) February 14, 2024
We've sold 4X more condoms compared to a regular Wednesday. And I'm told that we'll get more demand in the next couple of hours
अल्बिंदर धिंडसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईनच्या दिवशी ब्लिकिंटवरून ३.५ पट अधिक लिपस्टिकची विक्री झाली. 'रोज डे'च्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट आहे. आज बरीच जोडपी बाहेर जात आहेत असे दिसते, असेही धिंडसा यांनी नमूद केले. बुधवारी ब्लिंकिटवरून चॉकलेट्स, गुलाब आणि पुष्पगुच्छ यांचीही खरेदी झाली. अल्बिंदर धिंडसा यांनी मिश्किलपणे म्हटले की, ब्लिंकिटवर मी आज सर्वाधिक सर्चेसमध्ये हातकडी पाहत आहे. तसेच व्हॅलेंटाईन दिवशी कंडोमची विक्री इतर दिवसाच्या मागणीच्या ४ पट अधिक होती, असेही त्यांनी सांगितले.