जळगाव : येथील सराफा बाजारातील सोन्याचा भाव काही दुकानांत ३३ हजार, काही दुकानांत ३४ हजार तर काही दुकानांत ३० हजार रुपये प्रति १० ग्रॅम असा होता. यामुळे सोनेखरेदी करण्यासाठी निघालेले ग्राहकही संभ्रमात पडले. जे भाव गुरुवारी सकाळी जाहीर झाले त्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक भाव आकारले जात असल्याने अनेक ग्राहक सोने खरेदी न करता परत गेले. परिणामी, सराफ बाजारामध्ये गुरुवारीही शुकशुकाट होता.
सोन्याचे
तीन भाव
अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने सराफा बाजारातील ग्राहकसंख्या रोडावली आहे. पुढील १५ दिवस अशीच स्थिती राहील म्हणून काही विक्रेत्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली. दुपारी १ वाजेनंतर काही लहान दुकाने बंद झाली.
सोने मोडण्यासाठी किंवा विक्रीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रति तोळा ३० हजार रुपये भाव सांगितला जात होता. त्यामुळे अनेक ग्राहकांना विक्री न करताच परत जावे
लागले; तर दुकानांवर सोने विक्रीचेही तीन भाव होते.
सोन्याची तुकडा विक्री बंद होती. मुंबईतील घाऊक सोने विक्रेत्यांकडून १० ग्रॅमपुढील वजनाचे तुकडे जळगावातील सोने विक्रेते मागवितात. परंतु मुंबई येथील घाऊक विक्रेतेही ग्रॅममागे २ हजार रुपये अधिक मागत आहेत.
600तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेले सोने गुरुवारी ६00 रुपयांनी घसरून ३१,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ज्वेलरांनी खरेदी कमी केल्याचा तसेच स्टॉकिस्टांनी नफा वसुली केल्याचा फटका सोन्याला बसला. चांदीही ३00 रुपयांनी
उतरून ४४,७00 रुपये किलो झाली.
ब्लॉक मनी
येथील सराफा बाजारातील सोन्याचा भाव काही दुकानांत ३३ हजार, काही दुकानांत ३४ हजार तर काही दुकानांत ३० हजार रुपये प्रति १० ग्रॅम असा होता.
By admin | Published: November 11, 2016 04:28 AM2016-11-11T04:28:07+5:302016-11-11T04:28:07+5:30