Lokmat Money > बिझनेस न्यूज > इलॉन मस्क अन् बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मोठा फटका; तर अंबानी-अदानींच्या संपत्ती मोठी वाढ

इलॉन मस्क अन् बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मोठा फटका; तर अंबानी-अदानींच्या संपत्ती मोठी वाढ

अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्क यांना मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:19 PM2023-09-03T19:19:18+5:302023-09-03T19:20:05+5:30

अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्क यांना मोठा फटका बसला आहे.

Bloomberg Billionaire Index: Elon Musk and Bernard Arnault loose; Ambani-Adani's wealth increased | इलॉन मस्क अन् बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मोठा फटका; तर अंबानी-अदानींच्या संपत्ती मोठी वाढ

इलॉन मस्क अन् बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मोठा फटका; तर अंबानी-अदानींच्या संपत्ती मोठी वाढ

Bloomberg Billionaire Index: जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्क यांना मोठा फटका बसला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, अब्जाधीशांच्या यादीत असलेले रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इलॉन मस्क
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क त्यांना एकूण $9.35 बिलियन किंवा सुमारे 77 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सध्या त्यांची संपत्ती 226 अब्ज डॉलरवर घसरली आहे.

बर्नार्ड अर्नॉल्ट
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. अर्नॉल्टची एकूण संपत्ती $ 3.04 अब्ज किंवा सुमारे 25 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 183 अब्ज डॉलर आहे.

मुकेश अंबानी
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत अंबानींच्या संपत्तीत $670 मिलियन किंवा सुमारे 5542 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $91.2 अब्ज आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 12व्या स्थानावर आहेत.

गौतम अदानी
गौतम अदानी यांचे अलिकडच्या काळात बरेच नुकसान झाले आहे. मात्र आता पुन्हा अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. यासोबतच अदानींची नेटवर्थही वाढली आहे. गेल्या 24 तासांत अदानीची एकूण संपत्ती $969 मिलियन किंवा सुमारे 8015 कोटी रुपयांनी वाढली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 21 व्या स्थानावर आहेत.

जेफ बेझोस
अॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती $162 अब्ज आहे. अलीकडच्या काळात जेफच्या संपत्तीत वाढ झाली आहे. तर लॅरी एलिसन 134 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे.

बिल गेट्स
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 129 अब्ज डॉलर आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. तर, लॅरी पेज $122 अब्ज संपत्तीसह सहाव्या स्थानावर आणि वॉरेन बफे $121 अब्ज संपत्तीसह सातव्या स्थानावर आहेत.

Web Title: Bloomberg Billionaire Index: Elon Musk and Bernard Arnault loose; Ambani-Adani's wealth increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.