Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..?

हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..?

कंपनी या नोटीसविरोधात अपील करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:23 PM2024-08-27T17:23:01+5:302024-08-27T17:23:38+5:30

कंपनी या नोटीसविरोधात अपील करणार आहे.

blow to Hindustan Unilever, Income Tax department sent a 963 crore notice | हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..?

हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..?

HUL : आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू बनवणारी देशातील आघाडीची FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला (HUL) मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाकडून HUL ला नोटीस मिळाली आहे. या नोटीसद्वारे कंपनीला 962.75 कोटी रुपयांचा कर भरण्याचे आदेश दिले आहेत. यात 329.3 कोटी रुपयांच्या व्याजाचाही समावेश आहे. दरम्यान, देशातील आघाडीच्या FMCG कंपनीला नोटीस का आली, जाणून घेऊ...

नोटीस का मिळाली?
मिळालेल्या माहितीनुसार, टीडीएस कपात न केल्यामुळे हा कर लावल्याचे HUL ला नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. GSK समूह संस्थांकडून भारत HFD IPR च्या संपादनाशी संबंधित पेमेंटसाठी 3,045 कोटी रुपये पाठवताना TDS न भरल्याबद्दल हा कर लावण्या आला आहे. 2018 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरने GSK कडून हॉर्लिक्स ब्रँड 3,045 कोटी रुपयांना विकत घेतला होता. यामध्ये भारत, बांग्लादेशसह 20 हून अधिक देशांचा समावेश आहे. या संपादनाद्वारे, बूस्ट, माल्टोवा आणि विवासारखे इतर GSKCH ब्रँड HUL च्या पोर्टफोलिओमध्ये सामील झाले.

HUL नोटीसविरुद्ध अपील करणार 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात इंटेंजिबल अॅसेटचे ओरिजन लोकेशन त्याच्या मालकाच्या लोकेशनशी संबंधित असते. त्यामुळए इंटेंजिबल अॅसेट्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर कर लावता येत नाही. या आदेशाविरोधात कंपनी अपील करणार आहे. 

शेअर्सची स्थिती
कंपनीला नोटीस मिळाल्यानंतर आज हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कंपनीचे शेअर्स दीड टक्क्यांहून अधिक घसरणीसह 2,777.25 रुपयांच्या पातळीवर आले. 

Web Title: blow to Hindustan Unilever, Income Tax department sent a 963 crore notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.