Lokmat Money > बिझनेस न्यूज > या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी

या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी

Blue Collar Jobs: 2027 पर्यंत या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:13 IST2025-01-09T18:12:29+5:302025-01-09T18:13:07+5:30

Blue Collar Jobs: 2027 पर्यंत या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.

Blue Collar Jobs: Jobs in this sector; Demand for 24 lakh employees by 2027 | या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी

या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी

Blue Collar Jobs: भारतात गेल्या काही काळापासून क्विक कॉमर्स (Quick Commerce) क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यामुळेच देशात ब्लू-कॉलर कामगारांची मागणीदेखील वाढू लागली आहे. आगामी काळात ब्लू कॉलर नोकऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. जॉब मॅचिंग आणि हायरिंग प्लॅटफॉर्म Indeed ने, 2027 पर्यंत भारतात 2.4 मिलिय (सुमारे 24 लाख) ब्लू कॉलर नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Indeed विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, क्विक कॉमर्स कंपन्यांनी सणासुदीच्या खरेदी आणि ई-कॉमर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या तिमाहीत 40,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जसजसा उद्योग विस्तारत आहे, तसतशी कुशल आणि अर्धकुशल कामगारांची मागणी वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील विविध उद्योगांमध्ये 24.3 लाख ब्लू-कॉलर कामगारांची आवश्यकता असेल आणि केवळ क्विक कॉमर्स क्षेत्रात पाच लाख नवीन रोजगार निर्माण होतील. 

या लोकांना सर्वाधिक मागणी 
सणासुदीच्या काळात क्विक कॉमर्स कंपन्या अशा लोकांची नियुक्ती करतात, जे वेअरहाऊस असोसिएट्स, डिलिव्हरी ड्रायव्हर्स, मार्केटिंग, पॅकेजिंग कामगार आणि लॉजिस्टिक यासारखी कामे हाताळू शकतात. नजीकच्या भविष्यात या क्षेत्राची मागणी वाढणार असून, कामगारांची तीव्र गरज भासणार आहे. 

ब्लू कॉलर जॉब्स म्हणजे काय, समजून घ्या?
ब्लू-कॉलर नोकरी म्हणजे अशी नोकरी, ज्यात कर्मचाऱ्यांना जास्त अंगमेहनत करावी लागते. या नोकरीसाठी शिक्षणाऐवजी शारीरिक श्रम, प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक असतो. यात डिलिव्हरी, पॅकेजिंग, लॉजिस्टिक इत्यादी प्रकारची कामे असू शकतात.

मासिक पगार किती मिळतो?
Indeed ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, डिलिव्हरी आणि किरकोळ क्षेत्रात काम करणाऱ्यांना सरासरी 22,600 रुपये पगार मिळतो.
 

Web Title: Blue Collar Jobs: Jobs in this sector; Demand for 24 lakh employees by 2027

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.