Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elon Musk Twitter : ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा

Elon Musk Twitter : ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यात आता अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 08:25 AM2022-11-02T08:25:14+5:302022-11-02T08:25:42+5:30

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यात आता अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

Blue Tick on Twitter to cost 8 dollars per month announces Elon Musk | Elon Musk Twitter : ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा

Elon Musk Twitter : ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यात आता अनेक बदल पाहायला मिळत आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे 'ब्लू टिक' सबस्क्रिप्शनसाठी आता तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवर 'ब्लू टिक’साठी लागणारे शुल्क जाहीर केले आहे. इलॉन मस्क यांच्या घोषणेनुसार, ट्विटरवरील 'ब्लू टिक'ची किंमत प्रति महिना 8 डॉलर्स (सुमारे 660 रुपये) असेल.

इलॉन मस्क यांनी मंगळवारी "ट्विटर ब्लू" च्या नव्या व्हर्जनची घोषणा केली. ज्यामध्ये ट्विटरच्या पोस्ट्सना रिप्लाय देणं, उल्लेख करणं आणि सर्च करण्यात प्राधान्यासोबत Twitter च्या सबस्क्रिप्शन सेवेला दरमहा 8 डॉलर्स आकारण्याची त्यांची योजना आहे.


मस्क यांनी पेड ब्लू टिक बाबत सांगितल्यानंतर सोशल मीडियावर याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. एका युझरनं इलॉन मस्क यांना ट्विट करत ब्लू टिक बाबत विचारणा केली होती. आपले मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत, तरीही आपल्याला ब्लू टिक का मिळत नाही? असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर मस्क यांनी त्याला रिप्लाय देत पेड ब्लू टिककडे लक्ष वेधले होते.

आणखी एकाचा राजीनामा
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटर अधिग्रहण करार पूर्ण केल्यानंतर आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा ताबा घेतल्यानंतर काही तासांनी आपण पद सोडलं असल्याची माहिती ट्विटरच्या जाहिरात प्रमुख सारा पर्सनेट यांनी मंगळवारी सांगितलं. परंतु त्यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण मात्र सांगितलं नाही.

Web Title: Blue Tick on Twitter to cost 8 dollars per month announces Elon Musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.