Join us

बोइंग ७३७ मॅक्सचे जानेवारीत उड्डाण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:24 AM

बोइंग कंपनीचे ७३७ मॅक्स विमान येत्या जानेवारी महिन्यात उड्डाणास उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्क : बोइंग कंपनीचे ७३७ मॅक्स विमान येत्या जानेवारी महिन्यात उड्डाणास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण विमानाच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअरमधील दोष काढून टाकण्याच्या प्रयत्नात कंपनी आहे, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. प्राप्त परिस्थितीत येत्या जानेवारी २०२० मध्ये बोइंग ७३७ मॅक्सचे उड्डाण पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, असे बातमीत फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) आणि पायलट संघटनेच्या नेत्यांतील अज्ञात सूत्रांचा हवाला देऊन म्हटले. परिस्थिती अस्थिर असून, कोणतीही निश्चित वेळ ठरविण्यात आलेली नाही. रविवारी अमेरिकन एअरलाइन्स ग्रुपने म्हटले की, बोइंग ७३७ मॅक्सची अनुपस्थिती प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे कंपनीने आतापर्यंत पाच वेळा उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. युनायटेड एअरलाइन्स होल्डिंग्जने या आठवड्यातही ७३७ मॅक्स २ नोव्हेंबरच्या आपल्या उड्डाण कार्यक्रमातून काढून टाकले आहे.