नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि वायुदलाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीला पुरवठ्याचे कंत्राट मिळाल्यास भारतात एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानांचा कारखाना उभारण्याची तयारी बोइंग कंपनीने दाखविली आहे.
भारतीय नौदलाचा आपल्या ताफ्यासाठी ५७-मल्टिरोल कॅरिअरबोर्न लढाऊ विमाने घेण्याचा बेत आहे. तेव्हा बोइंगची एफ/ए-१८ लढाऊ विमाने भारतीय नौदलासाठी योग्य ठरतील, असे बोइंगचे म्हणणे आहे. भारतात या लढाऊ विमानांचा कारखाना स्थापन करण्याच्या दृष्टीने आम्ही वाटाघाटी करीत आहोत. सुपर हॉर्नेस्ट विमान अत्याधुनिक आहे. भारतातही ही विमाने तयार केली जाऊ शकतात, असे बोइंगच्या एफ/ए-१८ या प्रकल्पाचे उपाध्यक्ष डॅन गिलियन यांनी सांगितले.
भारतीय नौदलाच्या जहाजांवर एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमाने तैनात करण्यासाठी यात कोणतीही सुधारणा वा बदल करण्याची गरज नाही, त्यामुळे ताशी उड्डाणाचा खर्चही कमी लागेल. भारतीय वायुदलाच्या गरजेवर बोइंगचा डोळा आहे.
जुनी मिग-२१ विमाने भारतीय वायुदल बदलणार आहे. जानेवारीत भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यातील जहाजांसाठी ५७ मल्टिरोल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
भारतीय नौदलाकडे सध्या ४५ मिग-२९-के विमाने आहेत. भारतीय नौदलातील जहाजांच्या दृष्टीने सहा विमाने सुसंगत आहेत. यात राफेल, एफ-१८ सुपर हॉर्नेट, मिग-२९ के (रशिया), एफ-३५-सी (अमेरिका) आणि ग्रीपेनचा (स्वीडन) समावेश आहे. एफ-१८, राफेल आणि मिग-२९ के ही विमाने दोन इंजिनची आहेत. अन्य तीन विमानांत एकच इंजिन आहे.
बोइंग भारतात उभारणार सुपर हॉर्नेट विमानांचा कारखाना, वाटाघाटी चालू
भारतीय नौदल आणि वायुदलाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीला पुरवठ्याचे कंत्राट मिळाल्यास भारतात एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानांचा कारखाना उभारण्याची तयारी बोइंग कंपनीने दाखविली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:02 AM2017-08-30T03:02:08+5:302017-08-30T03:02:12+5:30