रियाज सय्यद ,संगमनेर (जि.अहमदनगर)
कॉर्पोरेशन बँकेच्या व्यवस्थापकाने संगनमताने खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची बोगस खाती दाखवून त्यांच्या नावावर वाटप केलेले लाखो रूपयांचे कृषी कर्ज हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सुकेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब तात्याबा कुटे यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नसताना २९ आॅक्टोबर २०१५ रोजी कॉर्पोरेशन बँकेच्या संगमनेर शाखेकडून थकबाकीची नोटीस आल्याने त्यांना धक्काच बसला.
बँकेने सदर नोटिसीद्वारे कुटे यांना सी.सी.सी.के.११००४४ या क्रमांकाचे आपले खाते असून ७ लाख ३० हजार ८९४ रूपयांची थकबाकी असल्याचे भरण्यास सांगितले. त्यामुळे कुटे यांनी हे खाते नेमके कुणाचे? याची शहानिशा करण्यासाठी ४ डिसेंबर २०१५ रोजी बँकेत अर्ज करून कर्ज प्रकरणाच्या संपूर्ण कागदपत्रांची मागणी केली. कुटे यांच्या सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १०६(२ क पै)८ या मिळकतीचा सर्च १५ नोव्हेंबर २०११ रोजी बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकास दिल्याचे समजले. सदरचे बोगस कर्ज प्रकरण २०११ साली केल्याने कुटे यांनी वेळोवेळी जागेचे सात-बारा उतारे काढले.
मुळातच कर्ज नसल्याने सात-बारा उताऱ्यांवर बोजा नाही. बँकेने दिलेल्या माहितीनुसार २६ नोव्हेंबर २०११ रोजीच्या १ लाख ५० हजार रूपयांच्या एका धनादेशावर भाऊसाहेब तात्याबा कुटे यांची मराठीत बनावट स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या धनादेशावर स्वाक्षरी नसताना ३ लाख ५० हजार रूपये काढल्याचे समोर आले. कर्ज प्रकरणास लागणारी कागदपत्रे, डिक्लेरेशन फॉर्मवर कुटे यांची कोठेही स्वाक्षरी नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून, वकिलांकडून खोटा सर्च बनवून, खोटे कर्ज प्रकरण करून कुटे यांच्या नावावर ५ लाख रूपये काढल्याचे समोर आले आहे. तसेच कर्ज प्रकरणासाठी लागणारे स्टॅम्प सुकेवाडीतील विलास कुटे याने हस्ते घेतल्याचे दिसते. त्यामूळे फसवणूक झालेल्या कुटे यांनी १६ डिसेंबर २०१५ रोजी शहर पोलिसांत लेखी तक्रारीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या नावे काढले बोगस कृषी कर्ज
कॉर्पोरेशन बँकेच्या व्यवस्थापकाने संगनमताने खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची बोगस खाती दाखवून त्यांच्या नावावर वाटप केलेले लाखो रूपयांचे कृषी कर्ज हडप
By admin | Published: January 8, 2016 03:01 AM2016-01-08T03:01:50+5:302016-01-08T03:01:50+5:30