Join us  

फिशिंगचे जाळेच करते सर्वाधिक माल गट्टम...; बोगस वेबसाइट करतात सर्वाधिक लुबाडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 7:37 AM

या आतापर्यंत लोकांचे लाखो रुपये लुबाडले गेले.  

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत सायबर फसवणुकीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सायबर सुरक्षेवरील खर्चात २८ टक्के वाढ झाली आहे. यात फिशिंग म्हणजेच बनावट वेबसाईट अथवा ई-मेलच्या माध्यमातून फसवणुकीची प्रकरणे सर्वाधिक २२ टक्के आहेत. चोरी आणि इतर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्के आहे. या आतापर्यंत  लोकांचे लाखो रुपये लुबाडले गेले.  

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या ‘करन्सी अँड फायनान्स रिपोर्ट २०२३-२४’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, २०२०च्या तुलनेत २०२३ मध्ये डाटा चोरी (ब्रीच) रोखण्यासाठी करण्यात येणारा खर्च २८ टक्के वाढून २१.८ लाख डॉलर म्हणजेच १८.२५ कोटी रुपये झाला. सायबर सुरक्षेवरील जगभरातील हा खर्च वाढून ४४.५ लाख डॉलर म्हणजेच ३७.२५ कोटी रुपये इतका झाला आहे. आरबीआयच्या लोकपालाकडे २०२२-२३ या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. 

खर्च आणखी वाढणार : २०२८ पर्यंत सायबर सुरक्षेवरील जागतिक खर्च वाढून १३.८२ लाख कोटी डॉलर होईल. जगभरातील बँकांनी २०२० नंतर सायबर सुरक्षाविषयक गुंतवणूक ५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

 

टॅग्स :धोकेबाजी