Join us

बोईंग ...१ ...

By admin | Published: February 11, 2015 12:33 AM

फोटो आहे... एफ/पेजेस/१०एमआरओ .....

फोटो आहे... एफ/पेजेस/१०एमआरओ .....
कॅप्शन : मिहान-सेझमध्ये उभारण्यात आलेला बोईंग एमआरओचे हँगर.
- मेमध्ये कार्यान्वित होणार : पुन्हा दोन कंपन्यांची तयारी
नागपूर : विमानांची देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा असलेला बोईंग इंकचा मिहानमधील प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, यावर्षीच्या मे महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विमानाची देखभाल व दुरुस्तीसाठी कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाची सामग्री आणि उपकरणे उभारली आहेत. या सुविधांची पाहणी नागरी उड्डयण महासंचालनालयाच्या तज्ज्ञ चमूतर्फे केल्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. नागपूर विमानतळ ते एमआरओपर्यंत एमएडीसीतर्फे उभारण्यात येणाऱ्या २.५ कि़मी.च्या टॅक्सी वेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच एमआरओ कार्यान्वित होईल, असे सूत्रांनी सांगितले.
एमआरओची वैशिष्ट्ये
बोईंग एमआरओ हा मिहान-सेझमध्ये जवळपास ५० एकर जागेवर उभा आहे. प्रकल्पाचा समोरील भाग मिहान-सेझसाठी खुला तर मागील भागाकडून दुसरी धावपट्टी उभारण्यात येणार आहे. बोईंगने प्रशासकीय इमारत, कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर, रेस्ट रूम, अल्पोपहारगृह आणि अन्य सुविधा एमआरओ कॉम्प्लेक्सच्या १० एकर जागेत आहेत. उर्वरित जागेत बोईंगने ४०० बाय ४०० मीटरचे मोठे हँगर बांधले आहे. सहा मजली इमारतीएवढी या हँगरची उंची आहे. या हँगरमध्ये तीन नियमित आकाराचे (दोन इंजिनचे विमान) विमान अथवा एक मोठ्या आकाराचे विमान (चार इंजिनचे विमान) एकाच वेळी सामावू शकतील. यातील अद्ययावत उपकरणे आणि सामग्रीच्या सहाय्याने विमानाची जोडणी, दुरुस्ती, सर्व्हिसिंग, पेंटिंग आदी कामे करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर, प्रवासी व मालवाहू विमान, एक्झिक्युटिव्ह जेट आणि लढाऊ विमानांची दुरुस्ती होईल. बोईंग एमआरओ सुविधा आयएएफ मेन्टेनन्स बेससाठी बंधनकारक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोईंग एमआरओ हा बोईंग आणि एअर इंडियाचा संयुक्त उपक्रम असून संचालन एअर इंडिया करणार आहे. जवळपास ३०० एव्हिएशन अभियंते आणि ६०० सहायक कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. अभियंत्यांना बोईंग आपल्या सिटल फॅक्टरी किंवा शांघाय एमआरओ येथे प्रशिक्षण देणार आहे.