बोईंग ...२ ...
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM
बिझनेस मॉडेलया प्रकल्पामुळे विमानाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी विदेशात डॉलरमध्ये जाणारे चलन थांबणार आहे. शिवाय विदेशातील विमाने या एमआरओमध्ये येतील. सध्या चीनमध्ये एकच एमआरओ असून त्याचा उपयोग पूर्वेत्तर आशिया आणि आशियातील विमानांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी केला जातो. बोईंग एमआरओ नागपुरात कार्यान्वित झाल्यानंतर दक्षिण आशियाई देशातील विमाने येथे येतील. एअर इंडियासाठी हा उत्पन्नाचा स्रोत ठरणार आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांकडे जवळपास ३०० ते ४०० प्रवासी विमान आहेत. यापैकी बहुतांश विमाने नागपुरातील बोईंग एमआरओमध्ये येण्याची शक्यता आहे. दोन कंपन्यांची एमआरओसाठी तयारीबोईंग एमआरओसारख्या आणखी दोन कंपन्या मिहान-सेझमध्ये एमआरओ उभारण्यास उत्सुक आहेत. मॅक्स एरोस्पेस आणि इंदमार ही या दोन कंपन्यांची नावे असून त्यांनी एमएडीसीकडे जागेची मागणी केली आहे. हे एमआरओ बोईंगपेक्षा लहान असतील, असे सूत्रांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)