डायरेक्ट-टू-कंझ्युमर ग्रुप ब्युटी आणि पर्सनल केअर स्टार्टअप गुड ग्लॅम ग्रुपनं मेन्स पर्सनल केअर आणि वेलनेस प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत जॉईंट व्हेन्चर केलंय. ही कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत आपले प्रोडक्ट रेंज लाँच करेल अशी अपेक्षा आहे. अक्षय कुमार आणि गुड ग्लॅम ग्रुप दोघेही या संयुक्त उपक्रमात गुंतवणूक करतील आणि व्यवसाय वाढवण्यासाठी एकत्र काम करतील.
मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि ब्रँड डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होणार आहे. मी आयुष्यभर फिटनेसवर विश्वास ठेवला आहे आणि हाच अनुभव मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. ही प्रोडक्ट लाइन तयार करण्यासाठी उपकंपनी गुड ग्लॅम ग्रुपच्या गुड ब्रँड्स वर्टिकल अंतर्गत येईल. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखलीन अनेजा आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड ग्लॅम ग्रुप, जो महिलांसाठी पर्सनल केअर प्रोडक्ट श्रेणीशी संबंधित आहे, आता मेन्स कॅटेगरीमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ दर्पण सांघवी म्हणाले की, कंपनी गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. २०२१ डिजिटल मीडिया कंपनी स्कूपव्हूपचा ब्रँडचं अधिग्रहण मेन्स प्रोडक्ट्सच्या श्रेणीला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं कंपनीचे को-फाऊंडर आणि सीईओ दर्पण संघवी यांनी सांगितलं.