Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

गेल्या आठवड्यात अमेरिकी फास्ट-फुड कंपनी बर्गर किंगने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, या याचिकेत त्यांनी पुणे न्यायायलायने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:11 PM2024-08-27T13:11:57+5:302024-08-27T13:15:03+5:30

गेल्या आठवड्यात अमेरिकी फास्ट-फुड कंपनी बर्गर किंगने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, या याचिकेत त्यांनी पुणे न्यायायलायने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते.

Bombay High Court's relief to Burger King Pune restaurant will not be able to use the name till September 6 | मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

पुणे न्यायलयाने काही दिवसापूर्वी बर्गर किंग या कंपनीला मोठा धक्का दिला होता. या निर्णयाविरोधात अमेरिकी फास्ट फुड कंपनी बर्गर किंगने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे असून ६ सष्टेंबर पर्यंत पुण्यातील रेस्टॉरंट हे नाव वापरू शकणार नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने ब्रँड नेम वापरण्यास बंदी घातली आहे.

Adani Power Share : अदानी पॉवरची मीडल ईस्टमध्ये मोठी खेळी, सुरू केली नवी कंपनी; शेअर्समध्ये तेजी

गेल्या आठवड्यात बर्गर किंगने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत कंपनीने पुणे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. पुणे येथील बर्गर किंग रेस्टॉरंटविरुद्ध ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पुणे न्यायालयाने खटला फेटाळून लावला होता. जिल्हा न्यायालयाने खटला फेटाळल्यानंतर बर्गर किंगने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बर्गर किंगच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस. न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने २६ ऑगस्ट २०२४ सांगितले की, न्यायालय ६ सप्टेंबर रोजी कंपनीच्या अर्जावर सुनावणी करेल. कंपनीने रेस्टॉरंटविरुद्ध अंतरिम मनाई हुकूम मागणारा अर्ज दाखल केला आहे. पुणे न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या अंतरिम आदेशाला मुदतवाढ दिली जाईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले. या अंतर्गत आता रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही.

फास्ट-फूड कंपनीने रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्यापासून रोखण्यासाठी खटलाही दाखल केला. कंपनीने सांगितले की, रेस्टॉरंट देखील "बर्गर किंग" नावाचा वापर करत आहे, यामुळे कंपनीचा व्यवसाय तोटा तसेच कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे. 

२०११ पासून हा वाद सुरू

बर्गर किंग कॉर्पोरेशनने २०११ मध्ये पुणे कोर्टात केस दाखल केली होती. या खटल्यात कंपनीने पुण्यातील एक रेस्टॉरंट ‘बर्गर किंग’ नावाचा वापर करत असल्याचे म्हटले होते. तर भारतात हे रेस्टॉरंट सुरू करण्याआधीच अमेरिकेत बर्गर किंग कंपनी उघडली होती, असं यात म्हटले होते.

पुणे न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर कंपनीने आता उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. रेस्टॉरंट्सने ‘बर्गर किंग’ नाव वापरू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे. नाव वापरण्यावर अंतरिम बंदी घालण्याची न्यायालयाला मागणी केली आहे.

Web Title: Bombay High Court's relief to Burger King Pune restaurant will not be able to use the name till September 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.