Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाबीज बीजोत्पादकांना बोनस

महाबीज बीजोत्पादकांना बोनस

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) त्यांच्याशी संलग्न बीजोत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी यावर्षी बोनस देणार आहे.

By admin | Published: January 5, 2016 11:42 PM2016-01-05T23:42:22+5:302016-01-05T23:42:22+5:30

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) त्यांच्याशी संलग्न बीजोत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी यावर्षी बोनस देणार आहे.

Bonus to Mahabija Seed Producers | महाबीज बीजोत्पादकांना बोनस

महाबीज बीजोत्पादकांना बोनस

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) त्यांच्याशी संलग्न बीजोत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी यावर्षी बोनस देणार आहे. याशिवाय बीजोत्पादन कार्यक्रमातून निर्मित बियाण्यांची साठवणूक करण्यासाठी अकोल्यात सौरऊर्जेवरील वातानुकूलित बियाणे भांडारही महाबीज उभारणार आहे.
सहाशे कोटींच्या वर वार्षिक उलाढाल असलेल्या महाबीजची २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४४५ कोटी रुपये उलाढाल झाली. असे असले तरी महाबीजला २७ कोेटींचा नफा मिळाला आहे. महाबीजचे राज्यात सहा हजार भागधारक असून, या नफ्यातून भागधारक शेतकऱ्यांना त्यांच्या समभागाच्या १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. तद्वतच सहा हजार भागधारकांमधील दोन हजार बीजोत्पादक शेतकऱ्यांना पिक ावर प्रतिक्ंिवटल बोनस देण्यात येणार आहे. यामध्ये तूर, मूग आणि उडीद या पिकांना प्रतिक्ंिंवटल ४००, तर सोयाबीन पिकाला प्रतिक्ंिवटल ५० रुपये बोनस दिला जाणार आहे. महाबीजचे जे बीजोत्पादक शेतकरी आहेत, त्यांना त्यांच्या समभागाच्या दीडपट बियाणाचे कूपन दिले जाईल.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाबीजला २५ कोटी ९३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी बहुतांश म्हणजे २० कोटी ३८ लाख रुपये बीजोत्पादन कार्यक्रमावर खर्च केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत: दर्जेदार बियाणांची निर्मिती करावी हा यामागील उद्देश असून, या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बीजोत्पादन कार्यक्रमातून निर्मित बियाण्यांची साठवणूक करण्यासाठी अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत सौरऊर्जेवरील वातानुकूलित गोदाम बांधण्यात येणार आहे. या गोदामावर १ कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, असेच गोदाम भुसावळ येथेही बांधले जाणार आहे. महाबीजच्या सहा हजार भागधारकांपैकी दोन हजार भागधारकांनी बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला आहे. महाबीजने बिजोत्पादन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याने इतर कृषी संस्थादेखील बीजोत्पादनाच्या कार्यक्रमावर भर देत आहेत.

Web Title: Bonus to Mahabija Seed Producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.