Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस

'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस

पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अ‍ॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. ट्रॅकिंगच्या माध्यमाने आपण केव्हा बुकिंग केले आणि  आपले सिलिंडर केव्हापर्यंत डिलिव्हर होईल, हेही पाहता येईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 08:57 AM2022-11-30T08:57:11+5:302022-11-30T09:01:28+5:30

पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अ‍ॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. ट्रॅकिंगच्या माध्यमाने आपण केव्हा बुकिंग केले आणि  आपले सिलिंडर केव्हापर्यंत डिलिव्हर होईल, हेही पाहता येईल. 

Book LPG Cylinder by paytm and Get Bumper Cashback Know the complete process of Booking | 'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस

'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस

Paytm आपल्या युजर्ससाठी सातत्याने नव नवीन ऑफर्स जाहीर करत असते. आता पेटीएम Bharatgas, Indane आणि HP Gas च्या LPG सिलिंडर बुकिंगवर आपल्या युजर्सना कॅशबॅक देत आहे. पेटीएम पहिल्या गॅस सिलिंडर बुकिंगवर आपल्या युजर्सना 15 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. मात्र, पेटीएम वॉलेटच्या माध्यमाने बुकिंग केल्यास 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. महत्वाचे म्हणजे, पेटीएमच्या माध्यमाने युजर्स आपले बुकिंग ट्रॅकही करू शकतात. 

LPG सिलिंडर बुकिंगवर कॅशबॅक ऑफर -
Paytm ने 29 नोव्हेंबरला (मंगळवार) आपल्या युजर्ससाठी नवी कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्यांसाठी ही एक जबरदस्त ऑफर आहे. जर आपण पेटीएमवरील नवे युजर्स असाल, तर 15 रुपयांचा कॅशबॅक मिळविण्यासाठी आपल्याला 'FIRSTGAS' कोड वापरावा लागेल. तसेच, पेटीएम वॉलेटचा वापर केल्यास, युजर्सनी 'WALLET50GAS' कोड टाकल्यावरच त्यांना बुकिंगवर 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अ‍ॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. ट्रॅकिंगच्या माध्यमाने आपण केव्हा बुकिंग केले आणि  आपले सिलिंडर केव्हापर्यंत डिलिव्हर होईल, हेही पाहता येईल. 

Paytm वरून असं बुक करा LPG Cylinder -
Step 1 - Paytm ओपन करून रिचार्ज आणि बिल पेमेंट कॅटेगिरी अंतर्गत 'बुक गॅस सिलेंडर' टॅबवर जा.
Step 2 - आता एलपीजी सिलिंडर सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करा आणि नंतर आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर/17 अंकांच्या एलपीजी आयडी नोंदवा.
Step 3 - पेमेंट करून तुमच्या बुकिंगसह पुढे जा. आपण पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यांसारख्या आपल्या पसंतीच्या पेमेंट सिस्टिमने पेमेंट करू शकता.
Step 4 - पेमेंट केल्यानंतर, आपली बुकिंग कंफर्म होईल. यानंतर, यानंतर आपले गॅस सिलिंडर 2 ते 3 दिवसांत आपल्याला डिलिव्हर होईल, असे सांगितले जाईल.

Web Title: Book LPG Cylinder by paytm and Get Bumper Cashback Know the complete process of Booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.