Join us

एटीएमद्वारे बूक करा विमानाचं तिकीट आणि खरेदी करा सोन्याची नाणी

By admin | Published: September 30, 2016 12:08 PM

एटीएममधून आता तुम्ही केवळ पैसेच नाही तर चित्रपटाचं आणि विमानाचं तिकीटदेखील बूक करू शकतात. विशेष तर हे आहे की, यासाठी डेबिट किंवा क्रेडीट कार्डची आवश्यकता लागणार नाही

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 30 - एटीएममधून आता तुम्ही केवळ पैसेच नाही तर चित्रपटाचं आणि विमानाचं तिकीटदेखील बूक करू शकतात. विशेष तर हे आहे की, यासाठी डेबिट किंवा क्रेडीट कार्डची आवश्यकता लागणार नाही. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून तिकीट बूक करणं शक्य होणार आहे.
 
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, या नव्या एटीएमद्वारे तुम्ही बील जमा करण्यापासून ते सोन्याची नाणी खरेदी करण्याचं कामही करू शकतात. भारतात लवकरच हे नवे एटीएम सुरू होणार आहेत.  एफएसएस, सीएमएस, एजीएस यांसारखे एटीएम निर्माते अशाप्रकारचे नवे एटीएम लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.  याद्वारे बील पेमेंट,मोबाइल रिचार्ज, फॉरेन एक्सचेंज आदी कामं करता येणार आहेत. मुंबईतील बांद्रामध्ये तर अशाप्रकारचं एटीएम सुरूही करण्यात आलं आहे.
 
एटीएमद्वारे सोन्याची नाणी खरेदी करता येणं हे भारतीयांना नक्कीच आकर्षीत करेल असा विश्वास एजीएसचे अध्यक्ष रवी गोयल यांनी व्यक्त केला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातुनही या एटीएममध्ये उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं गोयल यांनी सांगितलं.  या एटीएममधून बॅंक अकाउंट सुरू करण्यापासून 50 हजारपर्यंतचं लोन पास करण्याच कामही होणार असल्याचं सांगितलं जात आहे.