Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे!

IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे!

IRCTC : जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे जास्त ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटसोबत लिंक करावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:06 PM2022-11-09T12:06:29+5:302022-11-09T12:08:03+5:30

IRCTC : जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे जास्त ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटसोबत लिंक करावे लागेल.

book upto 24 tickets in a month by linking aadhaar to irctc user id | IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे!

IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे!

नवी दिल्ली : देशातील बरेच लोक तिकीट काउंटरवरून रेल्वे तिकीट खरेदी करतात, तर दुसरीकडे, बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुक करतात. जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे जास्त ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटसोबत लिंक करावे लागेल.

दरम्यान, तुम्ही आधार लिंक न करता एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 12 ट्रेन तिकिटे बुक करू शकता. त्याचवेळी, आधार लिंक केलेल्या युजर आयडीद्वारे जास्तीत जास्त 24 तिकिटे बुक करता येतील.

आयआरसीटीसी अकाउंटला आधार कार्ड असे करा लिंक...
>> आयआरसीटीसीला आधारशी लिंक करण्यासाठी सर्वात आधी http://www.irctc.co.in वर जावे लागेल. येथे तुमचे लॉगिन डिटेल्स द्यावे लागतील.
>> यानंतर तुम्हाला MY ACCOUNT या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर Link Your Aadhar या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
>> आता तुम्ही आधार क्रमांक आणि व्हर्च्युअल आयडी इत्यादींची माहिती द्यावी लागेल.
>> यानंतर चेक बॉक्समध्ये जाऊन Send OTP वर क्लिक करावे लागेल.
>> तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
>> त्यानंतर Verify बटणावर क्लिक करावे लागेल आणि आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अपडेट बटणावर क्लिक करावे लागेल.
>> KYC पूर्ण झाल्यानंतर आयआरसीटीसी लिंक होईल.
>> ईमेलवर कन्फर्मेशन लिंक आल्यानंतर तुम्ही लॉग-आउट करू शकता.
>> तुम्ही तुमचे स्टेटस देखील तपासू शकता.
>> आता तुम्ही IRCTC वेबसाइटवर लॉग आउट करून आणि पुन्हा लॉग इन करून तिकीट बुक करू शकता.

Web Title: book upto 24 tickets in a month by linking aadhaar to irctc user id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.