Join us  

IRCTC Ticketing : एका PNR वर अनेक तिकिटांचं बुकिंग, मग कसं कराल एकच तिकिट कॅन्सल? पाहा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 2:25 PM

अनेकदा असे घडते की जर तुम्हाला ग्रुपमध्ये जायचे असेल तर एकाच पीएनआरवर अनेक लोकांची ट्रेनची तिकिटे बुक केली जातात. यामध्ये प्रत्येक प्रवाशाला वेगळे तिकीट लागत नाही.

अनेकदा असे घडते की जर तुम्हाला ग्रुपमध्ये जायचे असेल तर एकाच पीएनआरवर अनेक लोकांची ट्रेनची तिकिटे बुक केली जातात. यामध्ये प्रत्येक प्रवाशाला वेगळे तिकीट लागत नाही. पण जर एखाद्याचा प्लॅन बदलला आणि त्याने ट्रिप रद्द केली तर? अशा परिस्थितीत त्याला तिकीट रद्द करावे लागेल, अन्यथा प्रवास न करता त्याचे पैसे कापले जातील. एकाच पीएनआरवर अनेक लोकांची तिकिटे असल्याने ज्या प्रवाशाला प्रवास करावा लागत नाही तो काय करणार? त्याचे तिकीट रद्द करण्याचा नियम थोडा वेगळा आहे. एकत्र काढलेल्या तिकिटांच्या तुलनेत सिंगल तिकीट रद्द करणं तुलनेने सोपे असते.

तिकिटांचे बुकिंग तुम्ही जर रेल्वे काउंटरवरून केले असेल, तर ते रद्दही काउंटरवरच करावे लागेल. जर तिकीट बुकिंग आयआरसीटीसीच्या ई-तिकीटिंग वेबसाइटवरून केले असेल, तर तिकीट ऑनलाइन सहजपणे रद्द केले जाऊ शकते. जर तुम्हाला अनेक तिकिटांपैकी एखादे तिकिट रद्द करायचे असेल तर त्याला पार्शिअल कॅन्सलेशन म्हणतात. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयआरसीटीसी चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म तिकीट रद्द करण्याची सुविधा देते. तिकीट बुकिंग ऑनलाइन झाल्यामुळे हे काम तुम्हाला ऑनलाइन करावे लागेल हे लक्षात ठेवले पाहिजे. पाहूया ऑनलाइन कसं तिकीट रद्द करता येईल.

अशी असेल प्रक्रियासर्व प्रथम IRCTC ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in उघडा आणि तुमचं लॉग इन करा. तिकीट रद्दकरण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या माय ट्रान्झॅक्शन या ऑप्शनवर जा. त्यानंतर माय अकाउंट या मेन्यूतून Booked Ticket History या पर्यायावर क्लिक करा. त्यानंत तुम्हाला तुम्ही बुक केलेली तिकिटे दिसतील.

यानंतर जे तिकिट तुम्हाला रद्द करायचं आहे ते कॅन्सल तिकीट या पर्यायातून निवडा. ज्यांचं तिकीट रद्द करायचे आहे त्या प्रवाशांची नावे निवडा. चेक बॉक्ससमोर कॅन्सल तिकीटचा पर्याय निवडा. त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी येणाऱ्या पॉप अपवर क्लिक करा. यानंतर तुमचा कॅन्सलेशन चार्ज कापला जाईल आणि उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात येईल. तुम्हाला याची माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि ईमेलवरही मिळेल.

टॅग्स :भारतीय रेल्वेतिकिटआयआरसीटीसी