Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवडणूक काळात उसळी की घसरगुंडी? मागील पाच लोकसभांत शेअर बाजारावर झाला परिणाम

निवडणूक काळात उसळी की घसरगुंडी? मागील पाच लोकसभांत शेअर बाजारावर झाला परिणाम

गेल्या पाच निवडणुकांमध्ये शेअर बाजारावर कसा परिणाम झाला होता, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 08:02 AM2024-03-18T08:02:39+5:302024-03-18T08:03:07+5:30

गेल्या पाच निवडणुकांमध्ये शेअर बाजारावर कसा परिणाम झाला होता, वाचा सविस्तर

Boom or slump during the election? The stock market was affected in the last five Lok Sabhas | निवडणूक काळात उसळी की घसरगुंडी? मागील पाच लोकसभांत शेअर बाजारावर झाला परिणाम

निवडणूक काळात उसळी की घसरगुंडी? मागील पाच लोकसभांत शेअर बाजारावर झाला परिणाम

नवी दिल्ली: मार्च महिन्यात शेअर बाजाराने ७३ हजारांचा टप्पा ओलांडत विक्रमी उच्चांक नोंदविला. पुढील आर्थिक वर्षातही ही घोडदौड कायम राहील असा अंदाज आहे. या वर्षांची सुरुवातच लोकसभा निवडणुकीने होत आहे. 
आजवरच्या निवडणुकांदरम्यान मतदानाच्या दिवशी, मोजणी दिवशीही बाजारात चढ-उतार झाल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर गेल्या २५ वर्षांत लोकसभा निवडणुकांचे पडसाद बाजारावर कसे पडत गेले याचा घेतलेला आढावा रंजक ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

मतमोजणी सुरू असताना अन् निकालानंतर...

  • १९९९ मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान निवडणुका झाल्या. तेव्हा सेन्सेक्स ०.२ टक्क्यांनी घसरला. मतमोजणीवेळी ६ ऑक्टोबरला सेन्सेक्स ०.२ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. 
  • २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात (२० एप्रिल ते १० मे) सेन्सेक्स ४.२ टक्क्यांनी घसरला. १३ मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी ०.८ टक्के वाढ झाली.
  • २००९ मध्ये निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) डाव्या पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत परतली. 
  • १६ एप्रिल ते १३ मे या निवडणुकीच्या काळात सेन्सेक्स ६.५ टक्क्यांनी वाढला. १६ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नंतर दोन दिवसांनी १८ मे रोजी सेन्सेक्स १७.३ टक्क्यांनी वाढला.
  • २०१४ मध्ये निवडणुकांच्या दिवसांत (७ एप्रिल ते १२ मे) सेन्सेक्स ५.३ टक्क्यांनी वाढला. १६ मे रोजी निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी सेन्सेक्स एक टक्क्यांनी वाढून बंद झाला.
  • २०१९ मध्ये निवडणुकांच्या काळात (११ एप्रिल ते १९ मे) सेन्सेक्स १.७ टक्क्यांनी घसरला. मतमोजणीदिवशी २३ मे रोजी किरकोळ ०.८ टक्क्यांनी घसरला. 

Web Title: Boom or slump during the election? The stock market was affected in the last five Lok Sabhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.