Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ

देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ

तब्बल ८,०११ फिनटेक कंपन्या, वाढीचा वेग जगापेक्षा २३% अधिक; वित्तविषयक अहवालातील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 08:45 AM2024-08-01T08:45:09+5:302024-08-01T08:45:20+5:30

तब्बल ८,०११ फिनटेक कंपन्या, वाढीचा वेग जगापेक्षा २३% अधिक; वित्तविषयक अहवालातील आकडेवारी

booster to e market in the country growth in fintech companies | देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ

देशातील ई-बाजाराला बूस्टर; फिनटेक कंपन्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: डिजिटल क्रांतीच्या बाबतीत भारत सर्वात पुढे आहे. देशात डिजिटल पेमेंटचे प्रमाणही वाढले आहे. हे वाढण्यासाठी देशात उपलब्ध असलेले फिनटेक कंपन्यांचे जाळे अत्यंत महत्त्वाचे आहे. २२ जुलै २०२४ पर्यंत फिनटेक कंपन्यांची संख्या वाढून ८,०११ च्या घरात पोहोचली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा चलन आणि वित्तविषयक अहवाल २०२३- २४ नुकताच जारी करण्यात आला. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.

फिनटेक कंपन्यांना २७ अब्ज डॉलर्सचे फंडिंग

२०२२ पर्यंत देशातील फिनटेक कंपन्यांना १७ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला. २०३० पर्यंत कंपन्यांचा महसूल ११.१७ टक्क्यांनी वाढू १९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. भारतातील फिनटेक कंपन्यांना जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२३ या काळात २७ अब्ज डॉलर्सचे फंडिंग.

डिजिटल नेटवर्क मजबूत

- ८४% बँका आणि ३५% बिगर- वित्तीय संस्था डिजिटल बँकिंगमधील समस्यांच्या निराकरणासाठी फिनटेक कंपन्याशी भागीदारी करीत आहेत.

- ९२% बँका आणि ६०% बिगर- वित्तीय संस्थांना वाटते की या कंपन्यांची मदत बैंकिंगच्या समस्यांवर उपाययोजना करताना उपयुक्त ठरते.
 

Web Title: booster to e market in the country growth in fintech companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.