Success Story : गेल्या काही वर्षांत काही उद्योजकांनी देशात नवनवे स्टार्टअप्स सुरू करून मोठं यश मिळवलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांचा जन्म बिहारच्या एका छोट्या गावात झाला. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी परदेशात चांगली नोकरी केली. पण नंतर सर्व काही सोडून स्टार्टअप सुरू केलं आणि आता ते हजारो हँडिक्राफ्ट आर्टिस्टना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत आहेत.
ही कहाणी आहे बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या प्रशांत सिंग यांची. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पाटणा येथे झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. १९९८ मध्ये ते बँक ऑफ पंजाबमध्ये रुजू झाले. त्यानंतर आयडीबीआय बँक आणि रिटेल क्षेत्रात काम केल्यानंतर ते परदेशात गेले.
२०१३ मद्ये हँडिक्राफ्ट फिल्डमध्ये कामप्रशांत सिंग यांनी सुमारे दीड वर्षे दुबईतील बँकेत काम केलं. त्यानंतर ते मुंबईला परतले आणि डच बँकेत नोकरीला लागले. त्यानंतर ते टीव्हीएस इन्शुरन्स कंपनी, टीव्हीएसच्या रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनीत रुजू झाले. २०१३ नंतर त्यांनी हस्तकला क्षेत्रातही काम करायला सुरुवात केली आणि इंडिया आर्ट इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी सुरू केली.
जोडले गेलेत ५ हजार कारागिरप्रशांत सिंग यांच्या 'हाथ का बना' या स्टार्टअपशी ७५ हून अधिक क्राफ्टचे ५००० हून अधिक कारागिर जोडले गेलेल आहेत. 'हाथ का बना' हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. देशातील हस्तकला आणि हातमाग कारागिरांसाठी यातून रोजगार निर्माण होत आहे. हस्तकला आणि हातमाग कारागिरांना रोजगार देण्याबरोबरच, हे व्यासपीठ भारतातील पारंपारिक लोककला आणि हस्तकलेचा प्रचार करत आहे.
प्रशांत सिंग सांगतात की, त्यांनी क्रिकेटशी संबंधित अविस्मरणीय गोष्टी बनवून याची सुरुवात केली. कलेवरील प्रेमानं त्यांना अधिक जाणून घेण्याची प्रेरणा दिली. त्यांची प्रेरणा केवळ वैयक्तिक स्वार्थापुरती मर्यादित नव्हती. तळागाळातील लोकांचं जीवनमान उंचावणारा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा होती.