Lokmat Money > बिझनेस न्यूज > घे कर्ज अन् हाेऊ दे खर्च... नाेकरदार वर्गात उधारीचे प्रमाण वाढले, कर्जमुक्त असलेले घटले 

घे कर्ज अन् हाेऊ दे खर्च... नाेकरदार वर्गात उधारीचे प्रमाण वाढले, कर्जमुक्त असलेले घटले 

‘बँक बाजार’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. १३.४ टक्के नाेकरदार लाेक कर्जमुक्त आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:26 AM2024-11-01T11:26:35+5:302024-11-01T11:27:08+5:30

‘बँक बाजार’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. १३.४ टक्के नाेकरदार लाेक कर्जमुक्त आहेत.

Borrow and spend... Borrowing increased among the salaried class, while the debt-free decreased  | घे कर्ज अन् हाेऊ दे खर्च... नाेकरदार वर्गात उधारीचे प्रमाण वाढले, कर्जमुक्त असलेले घटले 

घे कर्ज अन् हाेऊ दे खर्च... नाेकरदार वर्गात उधारीचे प्रमाण वाढले, कर्जमुक्त असलेले घटले 

नवी दिल्ली : देशातील नाेकरदार वर्गासमाेर अडचणी वाढत असून कर्ज घेऊन खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणाम हा वर्ग पूर्वीच्या तुलनेत कर्जात बुडत असल्याचे चित्र आहे. गेल्या दाेन वर्षांमध्ये विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्यांचा आकडा माेठ्या प्रमाणात वाढला असून नाेकरी करणाऱ्या ९१ टक्क्यांपेक्षा जास्त लाेकांवर २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज झाले आहे. हा आकडा गेल्या वर्षी ८८ टक्के हाेता.

बँक बाजार’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. १३.४ टक्के नाेकरदार लाेक कर्जमुक्त आहेत. १९ टक्के कर्जमुक्त नाेकरदारांचे प्रमाण २०२२ मध्ये हाेते. नाेकरदार वर्ग आराेग्य, नातेसंबंध, प्रसिद्धी आणि प्रगतीसाठी कर्ज घेऊन पैसे खर्च करतात. तसेच जगण्याचा एकूणच वाढलेला खर्च आणि महागाईमुळे हा वर्ग आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. 

कशासाठी घेतात कर्ज?
घर खरेदी करणे, ही देशातील नाेकरदार वर्गाची प्राथमिकता आहे. तरुणांमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छाशक्ती वाढली आहे. 
पूर्व भारतातील नाेकरदार वर्ग शैक्षणिक कर्ज जास्त घेत आहे. दक्षिण भारतात कार लाेन, उत्तर व पश्चिम भारतात हाेम लाेन घेणारे जास्त आहेत. 
नाेकरी करणारे लाेक सर्वाधिक क्रेडिट कार्ड व कर्जाचा वापर करतात. याशिवाय हा वर्ग माेठ्या प्रमाणात ऑनलाईन शाॅपिंग करताे.

Web Title: Borrow and spend... Borrowing increased among the salaried class, while the debt-free decreased 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.