Join us

डिविडेंड देण्यात 'किंग' आहेत 'या' ३ सरकारी कंपन्या; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:54 PM

King Of Dividend Stocks : आज आम्ही तुम्हाला तीन सरकारी कंपन्यांचे शेअर्स सांगत आहोत जे लाभांश देण्यात किंग आहेत. नियमित लाभांश जाहीर करण्याचा या कंपन्यांचा इतिहास आहे. यापैकी कोणता शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

लाभांशातून कमाई करायची असेल तर सरकारी कंपन्यांकडे वळू शकता. सरकारी कंपन्या सातत्याने लाभांश देण्यासाठी ओळखल्या जातात.ग्रोथ स्टॉक्स अनेकदा गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असतात, परंतु अनेकांसाठी लाभांश देणारे शेअर्सदेखील पहिली पसंती असते. आज आम्ही तुम्हाला तीन सरकारी कंपन्यांचे शेअर्स सांगत आहोत जे लाभांश देण्यात किंग आहेत. नियमित लाभांश जाहीर करण्याचा या कंपन्यांचा इतिहास आहे. यापैकी कोणता शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी इंधन कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीनं प्रति शेअर एकूण ३१.५ रुपये लाभांश (अंतिम लाभांश १०.५ रुपये आणि अंतरिम लाभांश २१ रुपये) जाहीर केला. लाभांश जाहीर करण्याचा कंपनीचा मोठा इतिहास आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार कंपनीनं ६.५ टक्के लाभांश दिला आहे. बीपीसीएलने गेल्या २४ वर्षांत ४२ वेळा लाभांश दिला आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देत राहील.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) प्रामुख्यानं कच्च्या तेलाचं शुद्धीकरण, पेट्रोलियम उत्पादनांचं मार्केटिंग, हायड्रोकार्बनचं उत्पादन आणि ई अँड पी ब्लॉकचं व्यवस्थापन करते. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने प्रति शेअर ११ रुपये अंतिम लाभांश आणि १५ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी लाभांश देत आहे. एचपीसीएलनं २०२३ वगळता २००० सालापासून सातत्यानं लाभांश दिला आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने ३५ वेळा लाभांश दिलाय.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)

आयओसीएल ही भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. रिफायनिंगपासून ते नॅचरल गॅस आणि पेट्रोकेमिकल्स एक्सप्लोरेशन, प्रॉडक्शन आणि मार्केटिंग पर्यंत कंपनीचे व्यवसाय आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने प्रति शेअर एकूण १२ रुपये लाभांश (अंतिम लाभांश ७ रुपये आणि अंतरिम लाभांश ५ रुपये) जाहीर केला. लाभांश जाहीर करण्याचा कंपनीचा मोठा इतिहास आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार कंपनीनं ८.५ टक्के इतका लाभांश दिला आहे. आयओसीएलने गेल्या २४ वर्षांत ३८ वेळा लाभांश जाहीर केलाय.

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक