नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गत आता बीपीसीएल ग्राहक व्हॉट्सअॅपवरुन घरगुती गॅस (एलपीजी) बुकिंग करू शकतात. बीपीसीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "भारत गॅसचे (बीपीसीएलच्या एलपीजी ब्रँड नाव) देशभरात असलेले ग्राहक व्हॉट्सअॅपवरुन कोठूनही स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर बुक करू शकतात."
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे बुकिंग व्हॉट्सअॅपवर बीपीसीएल स्मार्टलाईन नंबर 1800224344 वर करता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून बुकिंग करावे लागणार आहे. बीपीसीएलचे अधिकारी अरुण सिंह यांनी सांगितले की, "एलपीजी बुकिंग करण्यासाठी या तरतुदीमुळे ग्राहकांना अधिक सोपे होईल. व्हॉट्सअॅपचा वापर आता सामान्य लोकांमध्ये खूप होत आहे. तरुण असो की वयस्कर, प्रत्येकजण त्याचा वापर करतो आणि या नव्या सुरुवातीने आम्ही आमच्या ग्राहकांच्या जवळ पोहचू शकतो."
कंपनीचे कार्यकारी संचालक आणि एलपीजीचे प्रभारी टी. पीतांबरम यांनी सांगितले की, "व्हॉट्सअॅपवरुन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना बुकिंगचा मेसेज मिळेल. यासह, त्यांना एक लिंक देखील मिळेल, ज्यावर ते डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि अॅमेझॉन सारख्या इतर अॅप्सद्वारे देखील पैसे भरू शकतील"
एलपीजी डिलिव्हरीवर लक्ष ठेवणे आणि त्याबद्दल ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेणे यासारख्या नवीन उपक्रमाबाबत विचारही कंपनी करत आहे. येत्या काही दिवसांत कंपनी ग्राहकांना सुरक्षा जागरुकतासह अधिक सुविधा देईल, असेही टी. पीतांबरम यांनी सांगितले. दरम्यान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील दुसर्या क्रमांकाची पेट्रोलियम वितरण कंपनी आहे. कंपनीचे 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत.
आणखी बातम्या...
Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!
ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा
CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्क