Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक पडझडीमुळे बाजाराच्या वाढीला ब्रेक

जागतिक पडझडीमुळे बाजाराच्या वाढीला ब्रेक

देशाच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ, सरकारी बॅँकांना लवकरच होऊ घातलेला भांडवल पुरवठा आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली घट अशा अनुकूल वातावरणामध्ये सुरू असलेल्या शेअर बाजाराला अमेरिकेच्या निर्णयांमुळे विक्रीचे जबर धक्के बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:00 AM2018-12-24T06:00:54+5:302018-12-24T06:01:12+5:30

देशाच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ, सरकारी बॅँकांना लवकरच होऊ घातलेला भांडवल पुरवठा आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली घट अशा अनुकूल वातावरणामध्ये सुरू असलेल्या शेअर बाजाराला अमेरिकेच्या निर्णयांमुळे विक्रीचे जबर धक्के बसले

A break in market rally due to global downturn | जागतिक पडझडीमुळे बाजाराच्या वाढीला ब्रेक

जागतिक पडझडीमुळे बाजाराच्या वाढीला ब्रेक

- प्रसाद गो. जोशी

देशाच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ, सरकारी बॅँकांना लवकरच होऊ घातलेला भांडवल पुरवठा आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली घट अशा अनुकूल वातावरणामध्ये सुरू असलेल्या शेअर बाजाराला अमेरिकेच्या निर्णयांमुळे विक्रीचे जबर धक्के बसले आणि सप्ताहाच्या उत्तरार्धात प्रमुख निर्देशांक कोसळले. यामुळे सहा सत्रांमध्ये वाढत असलेल्या बाजार निर्देशांकांना ब्रेक लागला.
बळकट होत असलेला रुपया आणि कमी झालेली व्यापार तूट अशा सकारात्मक वातावरणात मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,१२९.१३ असा वाढून खुला झाला. त्यानंतर, तो ३६,५५४.९९ ते ३५,६९४.७४ अंशांच्या दरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३५,७४२.०७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये २२०.८६ अंशांनी (०.६१ टक्के) घट झाली आहे. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहाच्या प्रारंभी तेजी होती. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०,७५४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात ५१.४५ अंशांनी (०.४७ टक्के) घट झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये मात्र वाढ झाली आहे. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप ६०.१६ अंश वाढून १५,२५३ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप १४,६३३.६२ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये १३१.९६ अंशांची वाढ झाली आहे.
भारताच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि यामुळे कमी झालेली व्यापारी तूट, तसेच सरकारी बॅँकांना मिळणारे भांडवल या घोषणांमुळे बाजार तेजीत होता. मात्र, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये केलेली वाढ आणि त्यामुळे जगभरातील कोसळलेले बाजार याचा परिणाम भारतीय बाजारावर होऊन तेथे सप्ताहाच्या अखेरीस मोठी घसरण झाली. परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये १०४०.७२ कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र, देशी वित्तसंस्थांनी विक्री करून नफा कमविला. शनिवारी केलेल्या जीएसटी कपातीचा परिणाम या सप्ताहात बघावयास मिळेल.

भारतीय शेअर बाजार जगातील सातव्या क्रमांकावर

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने स्वीकारलेले कडक धोरण आणि अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चिंतेत असलेल्या जगातील अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आता जगातील सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. युरोपमध्ये अव्वल असलेल्या जर्मनीला मागे सारून भारताने हे स्थान पटकावले आहे.
अमेरिकन राष्टÑाध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांनी निर्यातीवर भर देणाऱ्या अर्थव्यवस्थांमधील गुंतवणूक टाळली आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातीचा वाटा ३८ टक्के आहे, तर भारताचा केवळ ११ टक्के. त्यामुळेच भारताला गुंतवणुकीसाठी प्राधान्य मिळाले.
सन २०१८मध्ये एमएससीआय हा उदयोन्मुख बाजारपेठांचा निर्देशांक १७ टक्के घटला असतानाच, मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सुमारे ५ टक्के वाढ दिल्यानेच भारतीय बाजाराला हा बहुमान लाभला आहे.

Web Title: A break in market rally due to global downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.