Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई

Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई

मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:13 PM2023-08-01T14:13:14+5:302023-08-01T14:14:25+5:30

मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

breaking ED raids Hero MotoCorp chairman Pawan Munjals house money laundering action after DRI case | Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई

Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई

हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल (Pawan Munjal) आणि अन्य काही लोकांच्या घरावर ईडीनं छापा टाकल्याची माहिती समोर आलीये. मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत हा छापा टाकण्यात आलाय. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार दिल्ली आणि गुरुग्राममधील मुंजाल यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) तक्रारीमुळे हा तपास करण्यात येत आहे. मुंजाल यांच्या निकटवर्तीयाविरोधात कथितरित्या ही तक्रार करण्यात आली आहे. अघोषित परकीय चलन बाळगल्याप्रकरणी या व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. 

बनावट कंपन्या चालवल्याचा आरोप
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं कथित कॉर्पोरेट गव्हर्नन्स समस्यांबद्दल हीरो मोटोकॉर्पविरुद्ध चौकशीचे आदेश दिल्याचं ईटीनं जून महिन्यात एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. हीरो मोटोकॉर्पवर कथितरित्या शेल कंपन्या चालवल्याचा आरोप आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या तपासातही कंपनी त्याच्याशी निगडीत संस्थांच्या तपासाची आवश्यकता असल्याचं समोर आलं होतं, असंही ईटीनं म्हटलं होतं.

शेअर्स घसरले
या छाप्यानंतर हीरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी दुपारी कंपनीचा शेअर ४.२६ टक्क्यांनी किंवा १३६.४५ रुपयांनी घसरून ३०६७.१० रुपयांवर ट्रेड करत होता.

Web Title: breaking ED raids Hero MotoCorp chairman Pawan Munjals house money laundering action after DRI case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.