Join us

Gautam Adani Asia's Richest Man: मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 8:41 PM

Gautam Adani ahead of Mukesh Ambani: अदानी पहिल्यांदाच ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना टाकलं मागे.

Gautam Adani Vs Mukesh Ambani: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी (Adani Group Gautam Adani) हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गौतम अदानी यांना पहिल्यांदा हे स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे अदानी यांनी रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Reliance Group Mukesh Ambani) यांना मागे टाकत हे स्थान मिळवलं आहे. दीर्घ कालावधीपासून मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरत होते.

गौतम अदानी यांची संपत्ती यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५५ अब्ज डॉलर्सनं वाढली आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती १४.३ अब्ज डॉलर्सनं वाढली. रिलायन्स आणि सौदी अरामको यांच्यातील डील रद्द झाल्यानंतर त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवर दिसून आला. कामकाजाच्या गेल्या सात दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये १०.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारीही रिलायन्सच्या शेअरमध्ये १.४८ टक्क्यांची घसरण होऊन तो २,३५० रूपयांवर आला. कंपनीचं मार्केट कॅप १४.९१ लाख कोटी रूपये होतं. तर दुसरीकडे अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

जूनमध्ये अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरणजून महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांचं वृत्त समोर आल्यानंतर अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. ६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये २० ते ६० टक्क्यांची घट झाली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा यात तेजी दिसून आली आता हे शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. आता या कंपन्यांचं मार्केट कॅप १० लाख कोटी रूपये झालं आहे.

शेअर्सचा परिणामजुलै महिन्यात शेअर्सची किंमत घसरल्यानंतर अदानी यांचं नेटवर्थ ६३.५ अब्ज डॉलर्स झालं. १२ नोव्हेंबर रोजी त्यांचं नेटवर्थ वाढून ८४ अब्ज डॉलर्स झढालं. अदानी समुहाच्या सातव्या कंपनीनं सेबीकडे IPO आणण्यासाठी अर्ज केला आहे. पुढील काही दिवसांत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीरिलायन्स