लंडन : गेल्या तब्बल साडेअकरा वर्षांत प्रथमच बुधवारी ब्रेंटचे कच्चे तेल ३५ अमेरिकन डॉलरच्या खाली आले. बाजारात तेलाचा प्रचंड पुरवठा आणि तेलाचे प्रमुख उत्पादक देश इराण व सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या वादातून तेल उत्पादनात कोणतीही कपात होण्याची शक्यता नसल्यामुळे तेल एवढे घसरले.
डॉलर मजबूत झाल्यामुळे ज्या देशांचे चलन कमकुवत आहे त्यांच्यासाठी तेलाची आयात आणखी महाग झाली आहे.
ब्रेंट नॉर्थ सीचे कच्चे तेल फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी बॅरलला ३४.८३ अमेरिकन डॉलर झाले होते. १ जुलै २००४ नंतरचा हा सगळ्यात खालचा भाव आहे.
बाजारातील व्यवहार संपला तेव्हा या तेलाचा भाव ३५ अमेरिकन डॉलर होता.
ब्रेंटचे कच्चे तेल ३५ डॉलरच्या खाली
गेल्या तब्बल साडेअकरा वर्षांत प्रथमच बुधवारी ब्रेंटचे कच्चे तेल ३५ अमेरिकन डॉलरच्या खाली आले.
By admin | Published: January 6, 2016 11:24 PM2016-01-06T23:24:04+5:302016-01-06T23:24:04+5:30